iPhone file transfer: तुमच्याकडे आयफोन आहे; पण तुम्हाला अँड्रॉइड फोनवर फाइल पाठवायची आहे. परंतु, हे तुम्हाला वायरलेस पद्धतीने आणि कोणत्याही अडचणीशिवाय करायचे असेल तर… या काही पद्धती तुमच्या उपयोगी पडू शकतात. मागीस काही वर्षांत अनेक विश्वसनीय आणि सुरक्षित फाइल्स ट्रान्स्फर पद्धती उदयास आल्या आहेत. आयफोनवरून अँड्रॉइड डिव्हाइसवर फाइल्स पाठविण्याचे अजूनही मार्ग आहेत आणि सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे त्यापैकी बहुतेक सुरक्षित आहेत. परंतु, ते नेमके मार्ग कोणते? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. गूगल ड्राइव्ह

गूगल ड्राइव्ह हा फाइल ट्रान्स्फर करण्याचा सर्वांत सोपा मार्ग आहे.

  • १. जर तुम्ही तुमच्या आयफोनवर गूगल ड्राइव्ह अॅप डाउनलोड केले नसेल, तर ते इन्स्टॉल करा.
  • २. अॅप उघडा आणि + आयकॉनवर टॅप करा.
  • ३. तुम्हाला काय अपलोड करायचे आहे त्यावर अवलंबून, अपलोड फाइल निवडा. नंतर फोटो आणि व्हिडीओ निवडा किंवा ब्राउझ करा.
  • ४. फाइल निवडा आणि ‘अपलोड करा’वर टॅप करा.
  • ५. अपलोड केल्यानंतर, Google Drive मध्ये फाइल शोधा, ‘तीन बिंदू मेनूवर टॅप करा आणि ‘अॅक्सेस व्यवस्थापित करा’वर टॅप करून फाइल अॅक्सेस करण्यायोग्य बनवा. सेटिंग एडिटरमध्ये बदला आणि लिंक कॉपी करा.
  • ६. तुमच्या अँड्रॉइड फोनवर लिंक पाठवा, ती उघडा आणि फाइल डाऊनलोड करा.

२. स्नॅपड्रॉप

स्नॅपड्रॉप हे वापरण्यास सोपे साधन आहे, ज्यासाठी कोणतेही अॅप्स इन्स्टॉल करण्याची आवश्यकता नाही. हेदेखील लक्षात घेण्यासारखे आहे की, ते तुम्हाला मीडियासह विविध प्रकारच्या फाइल ट्रान्स्फर करण्याची परवानगी देते.

  • १. तुमच्या आयफोन आणि रिसीव्हिंग अँड्रॉइड फोनवर snapdrop.net उघडा.
  • २. आता दोन्ही डिव्हाइस एकाच वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट केलेले आहेत ना याची खात्री करा.
  • ३. तुमच्या आयफोनवर, स्क्रीनवर दिसणाऱ्या अँड्रॉइड फोनच्या नावावर टॅप करा. अँड्रॉइड डिव्हाइस तपासून नाव पडताळून पहा.
  • ४. तुम्हाला ट्रान्स्फर करायची असलेली फाइल निवडा.
  • ५. ही फाईल अँड्रॉइड फोनवर दिसेल. फक्त ती सेव्ह करा आणि फाइल्स अॅपद्वारे ती अॅक्सेस करा.

३. गूगल फोटो

फोटो आणि व्हिडीओ ट्रान्स्फर करण्यासाठी गूगल फोटोज ही आणखी एक उत्तम पद्धत आहे परंतु, ती इतर फाइल प्रकारांना सपोर्ट करत नाही.

  • १ . तुमच्या आयफोनवर फोटो अॅप उघडा.
  • २ . तुम्हाला पाठवायचा असलेला फोटो किंवा व्हिडीओ निवडा.
  • ३. ‘शेअर करा’वर टॅप करा. नंतर ‘लिंक तयार करा’ निवडा.
  • ४. फाइल अपलोड केली जाईल (जर ती आधीच अपलोड केली नसेल तर) आणि शेअर करण्यायोग्य लिंक आपोआप तयार होईल.
  • ५. लिंक कॉपी करा आणि तुमच्या अँड्रॉइड फोनवर पाठवा.
  • ६. फाइल ॲक्सेस करण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी अँड्रॉइड फोनवर लिंक उघडा.

४. टॉफीशेअर

टॉफीशेअर हे स्नॅपड्रॉपसारखेच आणखी एक पीअर-टू-पीअर फाइल ट्रान्स्फर प्लॅटफॉर्म आहे. ते एंड-टू-एंड एन्क्रिप्शन देते, गोपनीयता सुनिश्चित करते.

  • १. तुमच्या आयफोनवर toffeeshare.com उघडा.
  • २. ‘फाइल्स निवडा’वर टॅप करा आणि तुम्हाला पाठवायची असलेली फाइल निवडा.
  • ३. हे प्लॅटफॉर्म एक शेअर करण्यायोग्य लिंक जनरेट करेल.
  • ४. लिंक कॉपी करा आणि तुमच्या अँड्रॉइड फोनवर पाठवा.
  • ५. फाइल डाउनलोड करण्यासाठी तुमच्या Android डिव्हाइसवर लिंक उघडा.