Child Born In Airplane : नवजात बाळाच्या नागरिकत्वासंदर्भात प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे आहेत. पण भारतात नवजात बाळाच्या नागरिकत्वाचा नियम पालकांशी संबंधित आहे. म्हणजेच जर तुम्ही भारतीय असाल, तर तुमचे मूल कुठेही जन्माला आले तरी ते भारतीय मानले जाईल. जगातील अनेक देश हा नियम पाळतात, पण काही देश असे आहेत की, जे आपल्या देशात जन्मलेल्या मुलालाच आपला नागरिक मानतात.

म्हणजेच जर तुमच्या मुलाचा जन्म अमेरिका किंवा कॅनडासारख्या देशात झाला असेल तर त्याला कोणत्याही अटीशिवाय तिथले नागरिकत्व मिळेल. यासोबतच इस्रायलसारखे देशही त्यांच्या धर्माच्या नावावर नागरिकत्व देतात. म्हणजेच तुम्ही जगात कुठेही जन्माला आलात, पण तुम्ही ज्यू असाल तर तुम्हाला इस्रायलचे नागरिक मानले जाईल. संपूर्ण जगात इस्रायल हा एकमेव देश आहे, जो अशा प्रकारे नागरिकत्व देतो.

High Court rejects plea for abortion in 31st week
एकतिसाव्या आठवड्यात गर्भापाताची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Delay in recommendation from Group of Ministers in GST Council meeting regarding insurance premiums
विमा हप्त्यांवर दिलासा नाही, जीएसटी परिषदेच्या बैठकीत मंत्रिगटाकडून शिफारशीत दिरंगाई; अन्य मुद्द्यांवर विचारविनिम
mh 370 flight
१० वर्षांनंतर उलगडणार २३९ प्रवाशांसह बेपत्ता झालेल्या विमानाचे गूढ? नेमके प्रकरण काय?
Radhika Apte confesses she and husband never wanted kids
“आम्हाला बाळ नको होतं”, मुलीच्या जन्मानंतर राधिका आपटेचं वक्तव्य; म्हणाली, “मी गरोदर आहे हे कळाल्यावर…”
Rahul Gandhi and Atul Subhash Case
Atul Subhash Case : अतुल सुभाष प्रकरणात न्यायाची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केला राहुल गांधींचा पाठलाग, गाडीतून चॉकलेट फेकलं? पाहा नेमकं काय घडलं
morning sickness nausea vomiting of pregnancy
‘मॉर्निग सिकनेस’चा सामना कसा कराल ?
visa free entry to indians
‘हा’ देश भारतीयांना देणार व्हिसाशिवाय प्रवेश; विनाव्हिसा प्रवेशाचा फायदा काय? कोणते देश ही सुविधा देतात?

जर बाळाचा जन्म फ्लाइटमध्ये झाला तर काय?

इंटरनॅशनल फ्लाइटने एका देशातून दुसऱ्या देशात जात असताना प्रवासादरम्यान एखाद्या बाळाचा जन्म झाला तर ते बाळ कोणत्या देशाचे नागरिक मानले जाते, असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. यात विशेषत: जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलाचे अमेरिका किंवा कॅनडासारख्या देशात नागरिकत्व हवे असते तेव्हा हा प्रश्न अधिक महत्त्वाचा बनतो. कारण या देशात जन्मलेल्या मुलालाच त्यांच्या देशाचे नागरिकत्व मिळते.

एखाद्या बाळाचा जन्म विमानात होऊ शकतो का?

एखाद्या बाळाचा जन्म खरोखरच विमानात होऊ शकतो का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर होय असे असले तरी ते अशक्यच आहे. कारण विमान प्रवासासाठी निश्चित केलेल्या नियमांनुसार, जर एखादी महिला ३६ आठवड्यांची गर्भवती असेल तर तिला विमानाने प्रवास करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. मात्र काही आपत्कालीन परिस्थितीत आणि काही वेळा वैद्यकीय कारणांमुळे यासाठी परवानगीही दिली जाते.

देशाचे पंतप्रधान कोण? या प्रश्नाचं पतीला उत्तर न देता आल्याने पत्नीने घेतला ‘हा’ धक्कादायक निर्णय

कायदा काय सांगतो?

वेगवेगळ्या देशांमध्ये नागरिकत्वाबाबत वेगवेगळे कायदे आहेत. अमेरिकेबद्दल बोलायचे झाल्यास तेथील नागरिकत्व कायद्यासंदर्भातील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या नियमावलीनुसार, जर एखाद्या बाळाचा जन्म विमानात झाला आणि त्या वेळी विमान अमेरिकेच्या हवाई हद्दीत असेल, तर त्या मुलाला अमेरिकेचे नागरिकत्व दिले जाईल. मात्र, जर मुलाचे आई-वडील रक्ताच्या नात्याच्या आधारे नागरिकत्व दिलेल्या देशाचे असतील तर त्यालाही तिथले नागरिकत्व मिळेल.

भारत आणि अमेरिकेत नियम काहीसे समान आहे. म्हणजेच एखाद्या भारतीय पालकांचे मूल विमानात जन्माला आले आणि मुलाच्या जन्माच्या वेळी ते विमान अमेरिकेच्या सीमेवर असेल, तर त्या मुलाला दोन्ही देशांचे नागरिकत्व मिळेल पण त्या मुलाला कोणत्या देशाचे नागरिकत्व द्यायचे आहे हे त्याच्या पालकांवर अवलंबून असेल.

Story img Loader