पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. कारण- येथे अनेक नामवंत विद्यापीठे आणि शाळा अस्तित्वात आहेत. त्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात उभारण्यात आलेल्या शाळांचाही समावेश होतो. पुण्यातील अग्रगण्य शाळांपैकीच एक म्हणजे ‘हुजूरपागा’. बाजीराव रस्ता जिथे लक्ष्मी रस्त्याला भेदतो, त्या चौकाला हुजूरपागा चौक म्हणतात. या चौकात एच.एच.सी.पी. म्हणजे ‘हिज हायनेस सर चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल’ आहे; पण या शाळेला अजूनही हुजूरपागा या नावानेच ओळखले जाते. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, हूजूरपागा नावाचा आणि शैक्षणिक कार्याचा काहीही संबंध नाही. तरीही या शाळेला असे नाव का देण्यात आले, असा प्रश्न अनेकांना पडतो. चला तर मग जाणून घेऊ या काय आहे हुजूरपागा शाळेची गोष्ट.

हुजूरपागा शाळेच्या नावाचा इतिहास?

लेखक सुप्रसाद पुराणिक यांनी ‘नावामागे दडलंय काय?’ या पुस्तकात पुण्यातील विविध ठिकाणांच्या नावांमागचा रंजक इतिहास सांगितला आहे. या पुस्तकात त्यांनी हुजूरपागा शाळेच्या नावाचा इतिहासदेखील मांडला आहे. हुजूरपागा ही पेशव्यांच्या काळातील सर्वांत मोठी घोड्यांची पागा होती. हुजूर हा एक पारसी शब्द आहे; जो खास किंवा महत्त्वाच्या व्यक्तींचा उल्लेख करताना वापरला जातो. अशा व्यक्तींच्या घोडेस्वाराला किंवा रक्षक दलाला हुजुरात, असे म्हटले जात असे. त्या काळातली महत्त्वाची व्यक्ती होते पेशवे. पेशवेकालीन पत्रव्यवहारामध्ये या हुजुरातीला ‘खाशास्वाऱ्या’, असे संबोधल्याचे आढळते. पेशव्यांच्या हुजरातीमध्ये नेहमी किमान दीड ते दोन हजार शिपाई असत. अशा वेळेस घोड्यांचे तबेले, देखभालीची व्यवस्था, गवत व चाऱ्याची साठवण यांकरिता प्रशस्त जागा हवी होती. त्यासाठी शनिवारवाड्यातील जागा पुरेशी नव्हती. म्हणून थोरल्या बाजीराव पेशव्यांनी शनिवारवाड्यापासून जवळ आंबिल ओढ्याच्या दुसऱ्या बाजूला एक मोठी मोकळी जागा हुजरातीच्या पागेसाठी निवडली. या पागेचे क्षेत्रफळ पाच एकर होते. पूर्व व उत्तर बाजूकडे मोठ्या दरवाजांसह भक्कम बांधकाम केलेल्या संरक्षण भिंती उभारल्या गेल्या होत्या. ही पागा १७३५ च्या आसपास उभारली गेली असावी. हुजरातीची पागा म्हणून ती हुजूरपागा या नावाने ओळखली जाऊ लागली. १८१८ मध्ये पेशवाईचा अस्त झाल्यानंतर हुजरातीची गरजदेखील संपली. पुढील काळात तिथे वाडे उभे राहिले, रस्ते झाले आणि त्यामुळे पागा आक्रसली, ओस पडली.

concepts of logos dialectic socrates philosophy
तत्त्व-विवेक : पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील ‘सॉक्रेटिक वळण’
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Arvi , Shivaji Primary School, Padma Chaudhary,
अशीही एक ‘मॅडम’ ! घर समजून शाळेचं रुपडंच बदलले
Gulbadan Begum's Hajj Pilgrimage
Mughal History: गुलबदन बेगमची हजयात्रा: श्रद्धेचा व स्वातंत्र्याचा शोध, ही यात्रा का ठरली इस्लामिक साम्राज्याची ओळख?
Letter of intent of unauthorized school in Dharavi cancelled
धारावीतील अनधिकृत शाळेचे इरादापत्र रद्द, शाळेतील ७०० विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत समायोजन होणार
Government school Number of students who have increased during the Corona period returns to their original positions Mumbai news
सरकारी शाळा पुन्हा ओस; करोनाकाळात वाढलेली पटसंख्या मूळ पदावर
history of Prayagraj
Maha Kumbh Mela 2025: २५०० वर्षांहून प्राचीन असलेल्या ‘प्रयागराज’चा पुरातत्त्वीय इतिहास नेमकं काय सांगतो?
Kaaba
पवित्र काबाला झाकण्यासाठी वापरण्यात येणारे ‘किस्वाह’ नेमके काय आहे?

हेही वाचा – मुंबईच्या ‘त्या’ सात बेटांची निर्मिती झाली तरी कशी? जाणून घ्या बॅकबे, वरळी अन् माहीम ‘बे’ची रंजक गोष्ट…

हुजूरपागेमध्ये शाळा केव्हा सुरु झाली?

स्वातंत्र्यपूर्व काळात सर विल्यम वेडरबर्न, न्या. महादेव गोविंद रानडे, डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, शंकर पांडुरंग पंडित, वामन आबाजी मोडक या मान्यवरांनी स्त्रीशिक्षणाची गरज ओळखली. या मंडळींनी एकत्र येऊन २९ सप्टेंबर १८८४ रोजी हायस्कूल फॉर नेटिव्ह गर्ल्स या संस्थेची स्थापना केली. १८ विद्यार्थिंनीसह सुरू झालेली ही शाळा आज हुजूरपागा म्हणून ओळखली जाते. १८८७ मध्ये संस्थेचे ‘महाराष्ट फिमेल एज्युकेशन सोसयटी’, असे नामकरण करण्यात आले. पुण्यात हुजूरपागा हायस्कूल सुरू झाले. कालांतराने संस्थेचे नाव महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी, असे बदलण्यात आले. हुजूरपागेतील अनेक विद्यार्थिनींनी आपापल्या क्षेत्रांत ठसा उमटविला आहे. सन १९११ मध्ये हुजूरपागेचा रौप्यमहोत्सव गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क यांच्या हस्ते साजरा झाला.

हेही वाचा – ताज हॉटेल जुनं की गेट वे ऑफ इंडिया? या ऐतिहासिक वास्तूंचा रंजक इतिहास जाणून घ्या

खरेच नावावरून वाटते तशी पेशवाईत या ठिकाणी हुजूरपागा नावाची घोड्यांची पागा अस्तित्वात होती. त्या जागेवर सध्या शाळा उभी असली तरी आजही सामान्य लोकांच्या तोंडी तेच पूर्वापार चालत आलेले हुजूरपागा हेच नाव आहे. त्यानिमित्ताने इतिहासातील एक आठवण जिवंत राहिली आहे.

Story img Loader