लॉयर (वकील) आणि ॲडवोकेट (अधिवक्ता) या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच वाटत असला तरीही दोन्ही शब्द वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जातात. भारतात लॉयर आणि ॲडवोकेट यांच्यात फरक आहे. लॉयर आणि ॲडवोकेट यांच्यातील फरक विविध घटकांवर आधारित असतो. लॉयर हा शब्द कायदेशीर व्यावसायिकांसाठी वापरला जातो ज्यांनी कायद्याची पदवी (LLB) पदवी घेतली आहे. जेव्हा एखादा वकील स्टेट बार कौन्सिलमध्ये सामील होतो आणि ऑल इंडिया बार कौन्सिलची परीक्षा उत्तीर्ण करतो तेव्हा त्याला ॲडवोकेट म्हणतात. लॉयर आणि ॲडवोकेटमधील हा फरक क्लिअर टॅक्स या वृत्तसंस्थेने स्पष्ट केला आहे.

ॲडवोकेट कायद्याच्या न्यायालयात क्लायंटचे (आशिलाचे) प्रतिनिधित्व करतो, तर लॉयर क्लायंटला कायदेशीर सल्ला देतो. प्रत्येक ॲडवोकेट हा लॉयर असतो, पण प्रत्येक लॉयर हा ॲडवोकेट नसतो. दोघेही कायदेशीर व्यावसायिक आहेत, परंतु ॲडवोकेटची जबाबदारी लॉयरपेक्षा जास्त असते. तसंच मोठी भूमिका असते कारण ॲडवोकेट ग्राहकांना (आशिलाला) कायदेशीर बाबींमध्ये सल्ला देऊ शकतो आणि न्यायालयात त्यांचे प्रतिनिधित्वही करू शकतो.

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Vishwa Hindu Parishad on temple and mosque row
“…म्हणून मशिदीच्या जागेवरील दावे वाढत आहेत”, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यानं सांगितलं कारण
Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Mumbai ED filed supplementary charge sheet against OctaFX and other related entities
ऑक्टाएफएक्स प्रकरण : ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल, देशातील व्यवहारांतून ८०० कोटी जमा केल्याचा आरोप

हेही वाचा >> सोन्याच्या साठ्यात भारत सौदी, युएईच्या पुढे! सर्वाधिक सोन्यासह पहिल्या क्रमांकाचा श्रीमंत देश कोणता? पाहा यादी

ॲडवोकेट म्हणजे काय?

ॲडवोकेट म्हणजे राज्याच्या बार कौन्सिलमध्ये नोंदणी केलेली व्यक्ती. ॲडवोकेटना त्यांच्या क्लायंटसाठी न्यायालयात बोलण्याचा अधिकार आहे. लॉयर आणि ॲडवोकेट यांच्यातील हा महत्त्वाचा फरक आहे. जेव्हा लॉयर बार कौन्सिल/असोसिएशनमध्ये सामील होतो तेव्हा तो ॲडवोकेट बनतो.

ॲडवोकेट म्हणजे व्यावसायिक प्रमाणपत्र, म्हणजे मान्यताप्राप्त कायदा विद्यापीठ/कॉलेजचे LLB प्रमाणपत्र आणि भारतातील बार कौन्सिलकडून कायद्याचा सराव करण्याचा परवाना असलेली व्यक्ती. ॲडवोकेटने बार कौन्सिल ऑफ इंडियाची परीक्षा उत्तीर्ण होताच, त्याला/तिला कोर्टात सराव करण्याचा परवाना दिला जातो.

अशा प्रकारे, ॲडवोकेट हे कायद्यातील विशेष अनुभव/प्रशिक्षण असलेले कायदेतज्ज्ञ असतात ज्यांना त्यांच्या ग्राहकांचे न्यायालयात प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. वकील एक व्यक्ती किंवा संस्था असू शकते जी न्यायालयात ग्राहकांचे प्रतिनिधित्व करते, जसे की कायदा फर्म, कंपनी इ.

हेही वाचा >> हत्तीचे दोनच दात दिसतात पण खायचे किती असतात? तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या…

लॉयर कोण आहे?

कायद्याची पदवी पूर्ण केलेली म्हणजेच एलएलबी पदवी प्रमाणपत्र असलेली व्यक्ती लॉयर म्हणून ओळखली जाते. तथापि, कायद्याची पदवी घेतल्याने वकील न्यायालयात क्लायंटचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र होत नाही. LLB मध्ये कायद्याची पदवी पूर्ण केल्यानंतर, वकिलाला कायद्याच्या कोर्टात सराव करण्यासाठी आणि ग्राहकांची प्रकरणे हाताळण्यासाठी ऑल-इंडिया बार परीक्षा (AIBE) उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

जेव्हा लॉयर AIBE पास करतो तेव्हा त्याला/तिला ॲडवोकेट म्हणून संबोधले जाऊ शकते. लॉयर हा एक कायदेशीर व्यावसायिक आहे, ज्याने कायद्याचा अभ्यास केला आहे आणि देशाचे कायदे पूर्णपणे समजून घेण्याची क्षमता आहे. लॉयरच्या सर्वात आवश्यक कर्तव्यांपैकी एक म्हणजे कायदेशीर बाबींमध्ये ग्राहकांना त्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्यांबद्दल सल्ला देणे. ते व्यक्ती आणि व्यवसायांसाठी कायदेशीर कागदपत्रे देखील तयार करू शकतात.

कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या कायदेशीर व्यावसायिकांना लॉयर म्हणूनही ओळखले जाते. लॉयरना कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्यासाठी बार कौन्सिलचा परवाना सोडावा लागतो. अशा प्रकारे, AIBE उत्तीर्ण झालेले आणि कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे वकिल न्यायालयात ग्राहकांचे प्रतिनिधित्व करण्यास अपात्र आहेत. त्यांना ॲडवोकेट म्हणून ओळखता येत नाही. तथापि, जेव्हा ते कॉर्पोरेट नोकरी सोडतात, तेव्हा ते कायद्याच्या न्यायालयात सराव करण्यासाठी बार कौन्सिल परवान्याची स्थिगिती सक्रिय करू शकतात आणि ॲडवोकेट म्हणून ओळखले जाऊ शकतात.

हेही वाचा >> मोदींकडून भारतातील स्वस्त इंटरनेटचं कौतुक, भारतीय महिन्यात नेटसाठी किती पैसे मोजतात? पाहा प्रमुख देशांमधील दर

लॉयर आणि ॲडवोकेट यांच्यातील फरक असा आहे की, ॲडवोकेट हा एक परवानाधारक कायदेशीर व्यावसायिक आहे, ज्याला भारतातील न्यायालयांमध्ये सराव करण्याचा अधिकार आहे. लॉयर केवळ ग्राहकांना कायदेशीर सहाय्य देऊ शकतात, तर ॲडवोकेट न्यायालयात त्यांचे प्रतिनिधित्व करतात आणि ग्राहकांच्या वतीने पुरावे देऊन आणि त्यांच्या ग्राहकांना सर्वोत्तम न्याय मिळवून देण्यासाठी युक्तिवाद करून त्यांच्या हक्कांसाठी लढा देतात.

Story img Loader