हिंदू धर्मात भगवान शिव सर्वात शक्तिशाली देवांपैकी एक आहे. भगवान शिव या देवतेला शंकर, महादेव, नटराज, रुद्र अशा अनेक नावांनी ओळखले जाते. त्यांना आदियोगी, परम तपस्वी, सर्व-दयाळू आणि दैवी रक्षक मानले जाते. भगवान शंकराची विविध रूपांत पूजा केली जाते. भिंतींवर टांगलेल्या त्यांच्या आणि देवी पार्वतीच्या प्रतिमा असोत, मंदिरात शिवलिंगाची पूजा असो किंवा भगवान नटराजच्या मूर्ती असोत. मात्र, शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग स्वरूपातील पूजेला विशेष महत्त्व आहे. अनेकांचा असा समज आहे की, शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग एकच असतात. परंतु, खरे सांगायचे झाल्यास यात फरक आहे. तो फरक काय? त्याविषयी जाणून घेऊ.

शिवलिंग म्हणजे काय?

‘शिवलिंग’ हे भगवान शिवाचे एक रूप आहे. याची पूजा सर्वात व्यापक आणि सामान्यपणे केली जाते. शिवलिंगाचे प्रकाशाच्या वैश्विक स्तंभाचे प्रतीक म्हणून वर्णन केले जाते, ज्यामध्ये भगवान शिवाची आभा आहे. शिवलिंग आकाराने दंडगोलाकार आणि त्याभोवती शाळुंका असा शिवलिंगाचा आकार असतो. शाळुंका हे स्त्रीच्या योनीचे प्रतिक असते अशी धारणा आहे.

Samsaptak Yog 2025
मिथुन राशीमध्ये निर्माण होतोय समसप्तक, ‘या’ ३ राशींच्या लोक जगतील सुख-समृद्धीचे जीवन, आयुष्यात होईल आनंदी आनंद
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Shani Pluto Ardhakedra yog
२२ जानेवारीपासून शनी घेऊन येणार गडगंज श्रीमंती; अर्धकेंद्र योग ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब बदलणार
sara ali khan visited shri shailam jyotirlinga
सारा अली खानने आंध्र प्रदेशमधील ‘या’ ज्योतिर्लिंगाला दिली भेट; फोटो शेअर करत म्हणाली, “साराच्या वर्षाचा पहिला…”
Surya Dev Lucky Rashi
Surya Dev Lucky Rashi : ‘या’ तीन राशींवर असते सूर्य देवाची विशेष कृपा, जीवनात मिळते अपार धन संपत्ती अन् यश
Numerology : Shani Dev blessing on lucky zodiac signs
Shani Dev : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनिदेवाची विशेष कृपा, मिळतो अपार पैसा अन् पद- प्रतिष्ठा
What do the green lights on the Smartwatch and how it saves life
तुमच्या स्मार्ट वॉचमध्ये चमकणाऱ्या हिरव्या लाईटचं काम काय? थेट हृदयाशी आहे त्याचा संबंध?
moon of Venus , Akola, space lovers Akola, Venus ,
काय सांगता? भरदिवसा शुक्राच्या चांदणीचे दर्शन! अवकाशप्रेमींसाठी अनोखी पर्वणी
हिंदू धर्मात भगवान शिव सर्वात शक्तिशाली देवांपैकी एक आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : सर्पदंश हा आजार मानला जाणार? कारण काय? याला अधिसूचित आजार घोषित करण्याची मागणी केंद्राकडून का होत आहे?

शिवलिंग कसे तयार केले जाते?

‘शिवलिंग’ विविध साहित्याने तयार केले जाते. पारंपरिकपणे ते संगमरवरी किंवा दगडाने तयार केले जात असे, परंतु आज लोक ते धातू, लाकूड किंवा अगदी मातीपासून तयार करू लागले आहेत. खरं तर काही लोक ‘बाबा बर्फानी’ म्हणजेच भगवान शिवाच्या अमरनाथ गुहेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बर्फाचा वापर करून सावन शिवलिंगही तयार करतात. शिवलिंग तयार करण्यासाठी वापरली जाणारी सर्वात सामान्य सामग्री म्हणजे दगड, विशेषतः काळा ग्रॅनाइट किंवा संगमरवरी आणि इतर सामग्रीमध्ये सोने, चांदी, तांबे किंवा पितळ यांचा समावेश होतो.

ज्योतिर्लिंग म्हणजे काय?

‘ज्योतिर्लिंग’ हे भगवान शिवाचे रूप आहे आणि ते माणसाने निर्माण केलेले नाही. ज्योतिर्लिंग हे ‘स्वयंभू’ असल्याचे म्हटले जाते, म्हणजेच ते स्वतःच प्रकट झालेले आहे आणि मानवी हातांनी तयार केलेले नाही. ज्योतिर्लिंग सोन्याने, दगडाने किंवा तांब्याने तयार करण्याऐवजी स्वतः देवाची ऊर्जा आणि मातीने तयार गेले असे म्हणतात.

‘ज्योतिर्लिंग’ हे भगवान शिवाचे रूप आहे आणि ते माणसाने निर्माण केलेले नाही. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

भारतातील १२ ज्योतिर्लिंगे

भारतात १२ ज्योतिर्लिंगांना सर्वात शक्तिशाली आणि पवित्र मानले जाते आणि ही १२ ज्योतिर्लिंगे पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत भारतभर पसरलेली आहेत. त्यात गुजरातमध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग, आंध्र प्रदेशातील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, मध्य प्रदेशातील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, उत्तराखंडमधील केदारनाथ ज्योतिर्लिंग, महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग, त्र्यंब्यकेश्वर ज्योतिर्लिंग आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, उत्तर प्रदेश येथील काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग, झारखंडमधील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, तामिळनाडूमधील रामेश्वर ज्योतिर्लिंगचा समावेश आहे.

हेही वाचा : ‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?

सर्वात शक्तिशाली ज्योतिर्लिंग कोणते?

१२ ज्योतिर्लिंगांपैकी वाराणसीमधील ‘काशी विश्वनाथ’ हे सर्वांत शक्तिशाली आणि पवित्र ज्योतिर्लिंग मानले जाते. भारतातील सर्वात प्राचीन आणि सर्वात पवित्र शहरांमध्ये स्थित, काशी विश्वनाथ हे विश्वाचे शासक असल्याचे म्हटले जाते. लोकांचा असा विश्वास आहे की, काशी विश्वनाथ मंदिरातील दर्शन आणि गंगा स्नानामुळे भूतकाळातील पाप मिटतात आणि मोक्ष प्राप्त करण्यासही मदत होते.

Story img Loader