हम दो हमारे दो असे काहीसे चित्र आता जवळपास सर्व ठिकाणी पहायला मिळते. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. एकाहून जास्त पिढ्या किंवा एकाच पिढीतील अनेक भावंडे एकाच घरात राहायची. भारतात ग्रामीण भागात ही पद्धत प्रचलित असली तरी शहरी भागातून ही पद्धत आता हळूहळू नाहीशी होत आहे.आता मात्र, लग्न झाली की भावडं आपला वेगळा संसार थाटतात. एकत्र कुटुंबात अनेक लोक एकत्र राहत असल्यानं प्रत्येकालाच एक नाव असायचं त्यानुसार सगळे त्याला आवजा द्यायचे. लहान मुलं पप्पा, आप्पा, अण्णा, बापू, आत्या. आक्का अशाप्रकारे मोठ्या हाक मारयचे. आजूनही आपण आप्पा, अण्णा, काका वगैरे म्हणत असतो. मात्र बऱ्याचदा आपण चुकतो. तुम्हीही तुमच्या घरातील मोठ्या छोट्या कांकाना आप्पा, अण्णा म्हणतच असाल, पण तुम्हाला माहितीये का अण्णा आणि आप्पा यांच्यामध्ये फरक काय? कोण धाकटं, कोण थोरलं? चला आजच्या लेखात आपण हे जाणून घेऊयात.
‘कहाणी शब्दांची: मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात लेखक सदानंद कदम यांनी हा अर्थ दिला आहे.
पूर्वी सगळीकडेच एकत्र कुटुंबपद्धती अस्तित्वात होती. घरात अनेक भावंडं. सख्खी आणि चुलत. मग त्यांच्यासाठी बहुतेक संबोधनं आली ती मात्र कन्नड भाषेमधून. त्यातीलच हे “अण्णा” आणि “आप्पा”. अण्णा म्हणजे मोठा भाऊ, तर आप्पा म्हणजे त्याच्यानंतरचा. पण हे शब्द लिहिताना मात्र आपण गडबड करतो. “अण्णा” आणि “आप्पा” ऐवजी आण्णा आणि अप्पा असे लिहितो. राजकारणी व्यक्तीसाठी ही संबोधनं आजही वापरली जातात. अण्णा भाऊ साठे हे तर साहित्यातलं सातासमुद्रापार गेलेलं नाव. पण खरं तर त्यांचं नाव तुकाराम. घरातले मोठे म्हणून लहान भावंडं त्यांना अण्णा म्हणू लागली आणि त्यांचं तेच नाव रूढ झालं आणि साहित्यप्रांतातही ते त्यांनी सार्थ करून दाखवलं.
हेही वाचा >> हत्तीचे दोनच दात दिसतात पण खायचे किती असतात? तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या…
तर अण्णा म्हणजे “थोरला” आणि आप्पा म्हणजे “धाकटा” मुलगा असा याचा अर्थ आहे. मात्र आपण यातही कधी कधी गडबड करते. त्यामुळे इथून पुढे हा फरक नक्क लक्षात ठेवा.