भारतात लांबच्या प्रवासासाठी ट्रेनची निवड केली जाते. ट्रेनचा प्रवास खर्च खिशाला परवडणारा असल्यामुळे ट्रेनमधुन प्रवास करण्याला प्राधान्य दिले जाते, यासह ट्रेनचा प्रवास आरामदायक देखील असतो. ट्रेनमधुन प्रवास करताना अनेकवेळा ट्रेनशी निगडित अनेक प्रश्न आपल्याला पडतात. त्यातीलच एक प्रश्न म्हणजे ट्रेनच्या वेगवेगळ्या नावांचे अर्थ. मेल एक्सप्रेस, एक्सप्रेस सुपरफास्ट ट्रेन अशी वेगवेगळी नावं तुम्ही ऐकली असतील. पण या नावांचा नेमका अर्थ काय जाणून घ्या.
मेल, एक्सप्रेस, सुपरफास्ट या नावांचा अर्थ:
आणखी वाचा: सफरचंद, बटाटे कापल्यानंतर काळे का पडतात? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण
मेल-एक्सप्रेस
भारतात वेगाच्या फरकानुसार अनेक ट्रेन्स आहेत. मर्यादित तासाच्या सरासरीने धावणाऱ्या गाडयांमध्ये मेल-एक्सप्रेस ट्रेन्सचा समावेश होतो. मेल-एक्स्प्रेस ट्रेनचा वेग सुपरफास्टपेक्षा कमी असतो. ही ट्रेन ताशी ५० किमी वेगाने धावते. प्रवासादरम्यान ही ट्रेन वेगवेगळ्या ठिकाणी थांबते. या ट्रेनचा नंबर बहुतांशवेळा १२३ असा सुरू होतो.
एक्सप्रेस
एक्सप्रेस ट्रेन्सचा वेग ताशी ५५ किमी असतो. म्हणजेच या ट्रेनचा वेग मेल-एक्सप्रेस ट्रेनपेक्षा जास्त असतो पण सुपरफास्ट ट्रेनपेक्षा कमी असतो. एक्सप्रेस ट्रेन मेल-एक्सप्रेस ट्रेनप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी थांबत नाही. एक्सप्रेस ट्रेनचे नाव एखादे शहर, ठिकाण किंवा व्यक्तीच्या नावावरून ठेवलेले असते.
आणखी वाचा: ट्रेनवर असणाऱ्या SA, 1A, 2A या कोड्सचा काय अर्थ असतो जाणून घ्या
सुपरफास्ट ट्रेन
सुपरफास्ट ट्रेचा वेग मेल एक्सप्रेस किंवा एक्सप्रेसपेक्षा जास्त असतो. या ट्रेनचा वेग ११० किलोमीटर प्रति तास असतो. या ट्रेनचे तिकीट दर इतर ट्रेन्सच्या तुलनेत जास्त असतात.