Difference Between Thank You And Thanks : दैनंदिन जीवनात आपण असे अनेक शब्द वापरतो, जे योग्य आहे की नाही याचा विचार करत नाही. काही शब्द आपण चुकीचे उच्चारतो किंवा लिहितो आणि आपल्याला ते कळतसुद्धा नाही. अनेकदा आपण इतरांचे अनुकरण करतो, पण तो शब्द योग्य आहे की नाही हे जाणून घेत नाही. जसे की “Thanks” आणि “Thank you”. तुम्ही हे दोन्ही शब्द अनेकदा वापरले असतील, पण तुम्हाला या दोन शब्दातील फरक माहिती आहे का?
“Thanks” आणि “Thank you” हे दोन्ही शब्द कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वापरले जातात. धन्यवाद म्हणताना किंवा आभार व्यक्त करताना आपण अनेकदा दिवसातून याचा वापर करतो, पण त्यासाठी दोन वेगवेगळ्या शब्दांची काय गरज? दोन्ही शब्द वेगवेगळ्या संदर्भात वापरले जातात का की फक्त आवड म्हणून वापरतात? आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत.
“Thanks” आणि “Thank You” या दोन शब्दातील फरक? (Difference Between Thank You And Thanks)
इंग्रजीमध्ये धन्यवाद किंवा आभार व्यक्त करण्यासाठी “Thanks” आणि “Thank you” चा वापर करतात. या दोन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे, त्यामुळे त्यांच्या अर्थांमध्ये कोणताही फरक नाही, पण हे शब्द कधी व कुठे वापरावे, यात फरक आहे.
“Thank you” हा शब्द खूप जास्त औपचारिक आणि नम्रपणा दाखवणारा आहे. हा सामान्यतः पद, वय किंवा वरिष्ठ व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. “Thanks” हा शब्द सहज वापरला जातो. अनौपचारिकपणे किंवा कुटुंब व मित्र-मैत्रिणींमध्ये वापरला जातो.
तुम्ही अनेकदा लोकांना “Thank you very much” किंवा “Thank you so much” असे बोलताना पाहिले असेल. ही वाक्ये तुमच्या मनातील भावना खूप उत्स्फूर्तपणे व्यक्त करतात आणि जेव्हा तुम्ही खूप जास्त कृतज्ञता व्यक्त करू इच्छिता तेव्हा ते वापरले जातात.