Difference Between Bamboo and Plastic Toothbrush : दात घासण्यासाठी अनेक जण चांगल्या टूथब्रशचा वापर करणं पसंत करतात. पण टूथब्रशमध्येही काही प्रकार असतात आणि त्यामध्ये असलेला फरण काही लोकांना माहित नसतो. बाजारात आता बांबूचा टूथब्रशही विक्रीसाठी आला आहे. पर्यावरणाची वाढती समस्या लक्षात घेता बहुतांश लोक प्लास्टिकच्या टूथब्रश ऐवजी बांबूच्या टूथब्रशचा वापर करायला लागले आहेत. घरात बांबूनी बनवलेल्या वस्तूंचा वापर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रोजच्या खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये या वस्तूंचा वापर अधिक प्रमाणात केला जातो.
बांबू टूथब्रशमुळे पर्यावरणाला कोणता फायदा?
प्लास्टिक पर्यावरणासाठी खूप धोकादायक आहे. यामुळे पर्यावरणाचं मोठं नुकसान होतं. बांबूंनी बनवलेल्या टूथब्रशला इको फ्रेंडली म्हटलं जातं. याचा हॅंडल बांबू आणि ब्रिस्टल्स नायलॉन किंवा दुसऱ्या नैसर्गिक फायबरचा बनवलेला असतो. बांबूचा टूथब्रशही प्लास्टिकवाल्या टूथब्रशप्रमाणेच असतो, पण याला बनवण्यासाठी बांबूचा वापर केला जातो.
प्लास्टिक होत नाही लवकर नष्ट
रिसर्चनुसार, जगभरात प्रत्येक वर्षी 44.8 टनहून अधिक प्लास्टिकचं प्रोडक्शन केलं जातं. यामुळे पर्यावरणाचं खूप मोठं नुकसान होत आहे. खरंतर, प्लास्टिक हजारो वर्षांपर्यंतही नष्ट होत नाही. त्यामुळे प्लास्टिकचा वापर फक्त टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू करण्यासाठी केला जातो.
बांबू आणि प्लास्टिकच्या टूथब्रशमध्ये काय फरक आहे?
बांबूच्या आणि प्लास्टिकच्या टूथब्रशमध्ये फक्त गरजेच्या वस्तूंचाच वापर केला जातो. बांबूचा टूथब्रश नवीन आहे, असंच लोकांना वाटतं. पण हा टूथब्रश जून्या प्रकारचाच आहे. रोजच्या वापरात असणाऱ्या टूथब्रशमध्ये ब्रिस्टलला बनवण्यासाठी नायलॉन आणि किंवा दुसऱ्या नैसर्गिक फायबरचा वापर केला जातो. पण पूर्वी हे ब्रिस्टल डुक्करांच्या केसांपासून बनवले जात होते. तसंच काही टूथब्रशच्या ब्रिस्टलमध्ये चारकोल मिळवलं जात होतं. ज्यामुळे दातांना स्वच्छ करण्यासाठी फायदा होतो. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही डेंटिस्टचा सल्ला घेतला पाहिजे.