Drinking Water: आपल्या सर्वांना अनेकदा हा प्रश्न नक्कीच पडला असेल की, पाणी खराब होण्याची काही तारीख असते का? खाण्यापिण्याबरोबरच पाण्याच्या बाटलीवर देखील एक्स्पायरी डेट लिहिली जाते. एका संशोधन अहवालानुसार, पाणी कधीही खराब होऊ शकत नाही. पाण्याच्या बाटलीवर लिहिलेली एक्सपायरी डेट फक्त प्लास्टिकच्या बाटलीशी संबंधित असते. आम्ही तुम्हाला सांगतो की बर्याच काळानंतर, प्लास्टिक हळूहळू पाण्यात विरघळू लागते आणि अनेक वर्षे प्लास्टिकच्या बाटलीत पाणी ठेवल्याने पाण्याला दुर्गंधी येऊ शकते. यासोबतच पाण्याच्या चवीवरही परिणाम होतो. बहुतेक वेळा असे दिसून येते की प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवर २ वर्षांपर्यंतची एक्स्पायरी डेट लिहिली जाते आणि या वेळेपर्यंत पाणी वापरणे योग्य मानले जाते.
प्लास्टिकचे तोटे काय आहेत?
प्लास्टिकपासून बनवलेल्या सर्व पाण्याच्या बाटल्यांमध्ये बीपीए नावाचे रसायन वापरले जाते. याचा आपल्या आरोग्यावर खोल आणि वाईट परिणाम होऊ शकतो. रिपोर्टनुसार, बीपीएमुळे रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारही होऊ शकतात. प्लॅस्टिकच्या बाटलीत जास्त वेळ पाणी ठेवल्याने त्यात प्लास्टिक विरघळू लागते आणि त्या पाण्याचे सेवन केल्याने शरीराला हानी होते.
( हे ही वाचा: ‘या’ गावातील लोकांची उंची फक्त ७ वर्षापर्यंत वाढते; प्रत्येक जण आहेत फक्त २-३ फुटाचे)
पाण्याची बाटली फक्त एकदा वापरण्यासाठी आहे, पाण्याच्या बाटलीला सिंगल यूज बाटली असेही म्हणतात. पण बहुतेक लोक तीच प्लास्टिकची बाटली बराच काळ वापरत राहतात. उष्णतेमुळे प्लास्टिकमधील रासायनिक बॉण्ड तुटू लागतात आणि रसायन हळूहळू पाण्यात विरघळू लागते.
त्यावर उपाय काय ?
पाण्याच्या बाटलीत प्लॅस्टिक विरघळू नये म्हणून पाणी व्यवस्थित जागी ठेवणे आवश्यक आहे. पाणी ठेवताना, लोक बहुतेकदा ते गरम ठिकाणी ठेवतात ज्यामुळे नुकसान होऊ शकते. पाणी थंड आणि कोरड्या जागी ठेवले तर त्यामुळे होणारे नुकसान टाळता येते. तसेच घरात स्वच्छ ठिकाणी पाणी ठेवावे.