म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा एक आदर्श मार्ग आहे, जेथे गुंतवणूकदार हे स्वतःच्या आवडीच्या फंडात किंवा मालमत्तेत गुंतवणूक करू शकतात, मग ते इक्विटी डेट किंवा सोने असो. आर्थिक तज्ज्ञांद्वारे व्यावसीयिकरित्या व्यवस्थापित केलेले हे फंड तुम्हाला कर बचतीच्या मार्गाने संपत्ती निर्माण करण्यात मदत करतात. गुंतवणूक ही लवचिक असते, त्यामुळेच त्यात तुम्हाला खरेदी, मिक्स, मंथन, हस्तांतरण किंवा सोईस्करपणे रिडीम करण्यासाठी अनेक पर्याय मिळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परंतु जेव्हा आपण कोणत्याही अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी (AMC)च्या वेबसाइटला भेट देतो, तेव्हा त्यावर समजण्यास कठीण असलेल्या विविध अटी आणि शर्थी आढळतात. त्यामुळे म्युच्युअल फंडाच्या जगाची व्याप्ती समजून घेण्यासाठी काही म्युच्युअल फंडांशी संबंधित जार्गन जाणून घेऊ यात.

AMC (अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी)

मालमत्ता व्यवस्थापन कंपनी ही व्यक्तींच्या निधीचे व्यवस्थापन करणारी कंपनी आहे. म्युच्युअल फंड हा भारतीय ट्रस्ट कायद्यांतर्गत नोंदणीकृत ट्रस्ट आहे. त्याची सुरुवात प्रायोजकाने केली आहे. प्रायोजक ही अशी व्यक्ती असते, जी म्युच्युअल फंड स्थापन करण्यासाठी एकट्याने किंवा कॉर्पोरेटबरोबर काम करते. प्रायोजकानंतर गुंतवणूक, विपणन, लेखा आणि फंडाशी संबंधित इतर कार्ये व्यवस्थापित करण्यासाठी एएमसी नियुक्त करतो. गुंतवणुकीच्या उद्दिष्टानुसार एकाच AMC द्वारे विविध फंड सादर केले जाऊ शकतात. हा एक पूल आहे, जिथे निधी गोळा केला जातो आणि व्यावसायिकरीत्या गुंतवणूक केली जाते आणि परतावा समान प्रमाणात वितरित केला जातो. विशेष म्हणजे भारतात सर्व AMCने त्यांचे कामकाज सुरू करण्यापूर्वी सेबीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.

हेही वाचाः PM किसान योजनेचा पुढील हप्ता ‘या’ महिन्यात येणार, अशा पद्धतीनं घ्या लाभ

NAV (निव्वळ मालमत्ता मूल्य)

जेव्हा आपण म्युच्युअल फंडांबद्दल बोलतो, तेव्हा नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू किंवा NAV अनेकदा उच्चार ऐकलाय मिळतो आणि ही एक परिचित संज्ञा आहे. आपल्यापैकी बहुतेकांनी हा शब्द ऐकला आहे, कारण तो बऱ्याचदा वापरला जातो. परंतु आपल्यापैकी फार कमी लोकांना माहीत असेल की या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे आणि त्याचा अर्थ कसा लावला जातो. सामान्य माणसाच्या भाषेत सांगायचे झाल्यास ही म्युच्युअल फंडाची प्रति शेअर किंवा युनिटची किंमत असते. शेअर्सच्या शेअरची किंमत असल्याने म्युच्युअल फंडांची NAV असते. जर आपण म्युच्युअल फंडाचे १०० युनिट्स खरेदी करत असाल तर आपण ते त्याच्या NAV वर खरेदी करतो. शेअर्सच्या किमती एक्सचेंजमध्ये दिवसभर चढ-उतार होत असले तरी NAV बदलत नाही. फंडाची एनएव्ही ट्रेडिंग दिवसाच्या शेवटी मोजली जाते.

हेही वाचाः वर्ल्डकप गमावला पण विक्रमी प्रेक्षकसंख्या कमावली; भारतात ४२२ अब्ज मिनिटे पाहिला गेला टीव्ही

NAV ची गणना कशी करतात?

हे ठराविक कालावधीत फंडाच्या कामगिरीचे सूचक आहे. एखाद्या विशिष्ट कालावधीत एखाद्या फंडाच्या NAV चा मागोवा घेतल्यास तो/ती फंडाची कामगिरी कशी आहे याचे मोजमाप करू शकतात आणि गुंतवणुकीचे निर्णय घेऊ शकतात. कमी एनएव्हीचा अर्थ असा नाही की, फंड चांगली कामगिरी करत नाही, दुसरीकडे जास्त एनएव्ही असलेला फंड चांगली कामगिरी करीत आहे. फंडाची कामगिरी तपासण्यासाठी त्याच कालावधीतील सापेक्ष वाढ लक्षात घेतली पाहिजे आणि गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे.