What is the meaning of Bombay word :स्वप्ननगरी म्हणून जगभरात ओळखली जाणारी मुंबई प्रत्येकाला आपली वाटते. समुद्रकिनाऱ्यावर वसलेले हे सुंदर शहर भारतातील एक सर्वोत्तम व्यावसायिक शहर आहे. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी मानतात. कारण- देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात मुंबईचे सर्वांत मोठे योगदान आहे.
मुंबई शहराचा इतिहास खरे तर खूप मोठा आहे. कधी कुणी या शहराला बॉम्बे म्हणायचे, तर कुणी बंबई. त्यापूर्वी मुंबा, मुंबापुरी या नावांनीही मुंबई ओळखली गेली. वर्षांमागून वर्षे सरली.. दिनदर्शिकेची पाने एकामागोमाग उलटत गेली आणि मग १९९५ मध्ये या शहराला अधिकृतपणे मुंबई हे नाव देण्यात आले. पण, तुम्हाला माहितीये का? पूर्वी मुंबईला बॉम्बे का म्हणायचे? बॉम्बे शब्दाचा अर्थ काय? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (what is the meaning of Bombay word How did mumbai get bomay name read journey Bombay to Mumbai)

मुंबई शहराची जुनी नावे

पूर्वी मुंबई शहराला काकामुची आणि गालाजुंकजा (Kakamuchee and Galajunkja) या दोन नावांनी ओळखले जायचे. ही शहराची जुनी नावे आहेत.
‘बॉम्बे’ हे नाव शतकानुशतके वापरले गेले तरी इतिहासात ‘मुंबई’ या नावाचेच अनेक संदर्भ सापडतात. पहिला संदर्भ पर्शियन लेखक अली मोहम्मद खान यांच्या १५०७ मध्ये लिहिलेल्या मजकुरात होता, जिथे त्यांनी शहराला ‘मानबाई’ म्हटले होते. कोळी मच्छीमार समुदाय हे या शहराचे रहिवासी होते, त्यांनी या शहराला ‘मुंबई’ नाव दिले. हे नाव कोळी समुदायाची देवी मुंबादेवीच्या नावावरून पडले आहे.

बॉम्बे शब्दाचा अर्थ काय? बॉम्बे हे नाव कसं पडलं?

युरोपियन आक्रमणादरम्यान पोर्तुगीज लोकांनी या शहराला ‘बॉम्बेम’ (Bombaim) म्हणून संबोधले होते, ज्याचा अर्थ होता ‘गुड बे’ म्हणजे चांगले बंदर.
जेव्हा १७ व्या शतकात ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय सुरतहून मुंबईत आणले तेव्हा त्यांनी ‘बॉम्बेम’चे ‘बॉम्बे’ असे नाव बदलले आणि शहराला बॉम्बे म्हणून नवीन नाव पडले.

१९९५ मध्ये जेव्हा महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत आली तेव्हा शहराचे नाव मराठा वारसा म्हणून प्रतिबिंबित व्हावे, अशी या पक्षाची इच्छा होती. शिवसेनेच्या पुढाकारामुळे पुढे नोव्हेंबर १९९५ मध्ये केंद्र सरकारने अधिकृतपणे या शहराचे नाव मुंबई, असे केले.

Story img Loader