Indian Railway : जेव्हा आपण ट्रेनने प्रवास करायचा असतो तेव्हा ट्रेन पकडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या स्टेशनवर आपल्याला जायचं असतं. पण प्रत्येक स्टेशनच्या नावामागे काहीतरी अर्थ दडलेला असतो. जसं सेंट्रल, जंक्शन किंवा टर्मिनल. यांचा वेगळाच अर्थ असतो. आज आम्ही तुम्हाला रेल्वे स्टेशनच्या नावाशी जोडलेल्या काही सत्य गोष्टींबाबत सांगणार आहोत. भारतीय रेल्वेचं नेटवर्क ६५ हजार किमीहून अधिक आहे. भारतात रेल्वे स्टेशनची एकूण संख्या जवळपास ७३४९ आहे. आम्ही तुम्हाला सेंट्रल, जंक्शन आणि टर्मिनल मध्ये नेमका फरक काय असतो, याविषयी सांगणार आहोत.
सेंट्रल रेल्वे
जेव्हा तुमची ट्रेन सेंट्रल स्टेशनवर थांबते, तेव्हा असं समजा की, हा स्टेशन शहरातील महत्वाचा आणि जूना स्टेशन आहे. इथे एकाच वेळी अनेक ट्रेन येजा करत असतात. सेंट्रल स्टेशन अशा शहारांमध्ये बनवलेलं असंत, जिथे दुसरे रेल्वे स्टेशनही असतात. मुख्य सेंट्रल स्टेशन मुंबई सेंट्रल, कानपुर सेंट्रल, चेन्नई सेंट्रल इ. आहेत. सेंट्रल स्टेशनच्या माध्यमातूनच मोठ्या शहरांना एकमेकांशी जोडलं जातं.
रेल्वे टर्मिनल
टर्मिनल आमि टर्मिनस दोघांमध्ये कोणताच फरक नसतो. टर्मिनल म्हणजे शेवटचा स्टेशन. म्हणजेच हा ट्रेनच्या त्या रुटचा शेवटचा स्टेशन असतो. ट्रेन या स्टेशनच्या पुढे जात नाही. म्हणूनच याला टर्मिनल म्हटलं जातं. टर्मिनल शब्द टर्मिनेशनवरून बनवला आहे. ज्याचा अर्थ संपलेला असा होतो. याची उदारहरणं म्हणजे, आनंद विहार टर्मिनल आणि छत्रपती शिवाजी टर्मिनल इ. आहेत.
रेल्वे जंक्शन
जर कोणत्या स्टेशनच्या नावाला जंक्शन असं म्हटलं असेल, तर समजून जा या ठिकाणाहून जास्त ट्रेन रुट जात आहेत. याचा अर्थ असा की, याठिकाणी कमीत कमी दोन ट्रेन एकत्र येऊ शकतात. सर्वात जास्त रेल्वे रुट वाला जंक्शन मथुरा आहे. या ठिकाणाहून सात रुट जातात. तर सेलम जंक्शनवरुन सहा रुट जातात. तर बरेली आणि विजयवाडा जंक्शनवरून पाच-पाच रुट जातात.