निरोगी राहण्यासाठी रोज फळं खाण्याचा सल्ला दिला जातो. हिवाळ्यात सगळ्या अनेक प्रकारची फळं भाज्या उपलब्ध होतात. त्यामुळे आपण अनेकदा भरपूर फळं भाज्या एकत्र खरेदी करतो. फळं खरेदी करताना त्यावर असणारे स्टिकर्स तुम्ही पाहिले असतील, या स्टिकर्सवर काही अंकही लिहलेले असतात. पण या अंकांचा काय अर्थ आहे हे अनेकांना माहित नसते. फळं फ्रेश दिसावी किंवा अधिक आकर्षक दिसावी यासाठी त्यावर स्टिकर लावले जाते असे मानून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण तसे नसुन या अंकांमागे महत्त्वाचे कारण असते. काय आहे ते कारण जाणून घ्या.
फळांवर असणाऱ्या अंकांचा अर्थ काय असतो?
फळांवर असणाऱ्या नंबरला पीएलयु कोड किंवा प्राईस लूकअप कोड म्हटले जाते. यामध्ये चार अंकांचा किंवा पाच अंकांचा कोड तुम्ही पाहिला असेल. या चार आणि पाच अंकांच्या कोडचा अर्थ काय आहे जाणून घ्या.
चार अंकी कोड
फळांवर जर चार अंकांचा कोड असेल आणि हा कोड ३ किंवा ४ या अंकाने सुरू होत असेल तर त्याचा अर्थ ते फळ उगवण्यासाठी भरपूर खत आणि कीटकनाशकांचा वापर करण्यात आला आहे. आधुनिक कृषी तंत्राचा वापर करून या फळाची निर्मिती करण्यात आली आहे.
८ ने सुरू होणारा पाच अंकी कोड
जर फळांवरील कोड पाच अंकी असेल आणि त्याची सुरुवात ८ अंकाने होत असेल तर याचा अर्थ ते फळ सेंद्रिय पद्धतीने पिकवण्यात आले आहे. या फळांच्या नैसर्गिक रुपातही बदल करण्यात आलेला असतो.
आणखी वाचा: केळ्यांचा आकार सरळ का नसतो? यामागचे कारण जाणून तुम्हीही व्हाल चकित
९ ने सुरू होणारा पाच अंकी कोड
जर फळांवरील कोड पाच अंकी असेल आणि त्याची सुरुवात नऊ या अंकाने होत असेल तर याचा अर्थ ते फळ उगवण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करण्यात आलेला नाही. म्हणजेच अशाप्रकारची फळं उगवण्यासाठी शेतीच्या पारंपरिक पद्धतीचा वापर केला जातो. अशा प्रकारची फळ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.