आज बहुतेक लोक आर्थिक व्यवहार करण्यासाठी डिजीटल पेमेंटचा वापर करतात. तसेच बँकांमधील गर्दी कमी करण्यासाठी ठिकठिकाणी एटीएम मशीन पाहायला मिळतात. यातून ग्राहक पैसे काढू शकतात आणि जमा देखील करु शकतात. यामुळे बँकेकडून ग्राहकांना एटीएम दिले जाते. यातून ग्राहक आपल्या मर्जीने पैसे काढू शकतात. तसेच अनेक कामं ही क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून केली जातात.
पण तुम्ही कधी डेबिट आणि क्रेडिट कार्ड निरखून पाहिलं आहे का? तुम्ही पाहिलं असे तर क्रेडिट आणि डेबिट कार्डवर Classic, Gold, Platinum आणि Titanium असे लिहिले असते. यातील कोणतही कार्ड तुम्ही निवडू शकता. पण तुम्हाला माहित आहे का कार्डवर लिहिलेल्या Classic, Gold, Platinum आणि Titanium मध्ये नेमका फरक काय असतो. चला तर मग जाणून घेऊ…
Visa Card म्हणजे काय?
Visa हे जगातील सर्वात मोठे पेमेंट नेटवर्क आहे. बँकांच्या भागीदारीत visa ने अनेक प्रकारचे कार्ड लाँच केले आहेत. Visa ही एक अमेरिक कंपनी आहे, भारतातील अनेक बँकांकडून Visa चे डेबिट कार्ड जारी केले जातात.
क्लासिक कार्ड म्हणजे काय?
क्लासिक कार्ड हे एकदम बेसिक कार्ड असते. जगभरात या कार्डमार्फत ग्राहकांना अनेक सेवा मिळतात. ग्राहक हे कार्ड केव्हाही रिप्लेस करु शकतात.
गोल्ड कार्ड म्हणजे काय?
जर ग्राहकांकडे Visa चे गोल्ड कार्ड असेल तर त्यावर ट्रॅव्हल असिस्टेंस आणि व्हिजाच्या ग्लोबल कस्टमर असिस्टेंस सर्विसेजसह अनेक फायदे मिळतात. हे गोल्ड कार्ड जगभरात एक्सेप्ट केले जाते. गोल्ड कार्ड ग्लोबल नेटवर्कशी संबंधित आहे. जर गोल्ड कार्ड रिटेल, डायनिंग आणि इंटरटेनमेंट आउटलेटवर स्वाइप केल्यास ग्राहकांना अनेक डिस्काउंट ऑफर्स मिळतात.
प्लॅटिनम कार्ड म्हणजे काय?
प्लॅटिनम कार्ड असलेल्या ग्राहकांना कॅश डिस्बर्समेंटसह ग्लोबल ATM नेटवर्कपर्यंत अनेक सुविधा मिळतात. याशिवाय त्यांना मेडिकल व लिगल रेफरल आणि असिस्टेंस देखील मिळतात. प्लॅटिनम कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना डील, डिस्काउंट आणि अनेक सुविधांचा लाभ मिळतो.
टिटानियम कार्ड
प्लॅटिनम कार्डच्या तुलनेत टिटानियम कार्डमध्ये ग्राहकांना क्रेडिट लिमिट जास्त मिळते. हे कार्ड चांगली क्रेडिट हिस्ट्री आणि जास्त इनकम असलेल्या लोकांना दिले जाते.