What is the meaning of January Word : सर्वांनी नुकतेच नवीन वर्षामध्ये पदार्पण केले आहे. ग्रेगोरियन दिनदर्शिके (कॅलेंडर)नुसार १ जानेवारीला नवीन वर्ष साजरे केले जाते. तुम्हाला माहितीये का इसवी सनपूर्व ४५ मध्ये १ जानेवारीपासून नवीन वर्ष साजरे सुरू करण्यात आले. त्यापूर्वी रोमन दिनदर्शिकेची सुरुवात मार्च महिन्यात होत असे. ही दिनदर्शिका ३५५ दिवसांची होती. या दिनदर्शिकेत फेब्रुवारी आणि मार्चदरम्यान काही वेळेस २७ किंवा २८ दिवसांचा अतिरिक्त महिना समाविष्ट केला जात असे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इ.स.पू ७०० मध्ये रोमचा दुसरा राजा नुमा पोम्पिलियस याने जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची नावे दिली; पण तुम्हाला माहितीये का? जानेवारी हे नाव कसे पडले आणि जानेवारी शब्दाचा अर्थ काय? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (what is the meaning of January how the name of first month of the year decided)

हेही वाचा : Fixed Deposit : तुम्ही किती फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट उघडू शकता? फक्त ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, आर्थिक नुकसानही होणार नाही

जानेवारी शब्दाचा अर्थ काय?

जानेवारी हा वर्षातील पहिला महिना. या महिन्याने वर्षाची सुरुवात होते. नवीन ध्येय, इच्छा घेऊन सर्व जण नवीन वर्षाची आनंदाने सुरुवात करतात. १ जानेवारीला एकमेकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतात. पण, तुम्हाला जानेवारी या शब्दाचा अर्थ माहितेय का? वर्षातील पहिल्या महिन्याचे नाव कसे पडले?
जानेवारी हे नाव ‘जानुस'(Janus) या रोमन देवतेच्या नावावरून ठेवण्यात आहे. Jānuārius या लॅटीन शब्दावरून Janus हे नाव घेतले आहे. ‘जानुस’ या रोमन देवतेला इंग्रजीमध्ये ‘God of Gates’ संबोधले जाते. याचा अर्थ ‘दरवाजा’ किंवा ‘सुरुवातीचा देव’ किंवा ‘सूर्याचा उदय’ असा होतो.

हेही वाचा : ChatGPT on WhatsApp: व्‍हॉट्सअ‍ॅपवर चॅटजीपीटीचा कसा करायचा वापर? फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स; पण असेल ही एक अट

नवीन वर्षाचा पहिला दिवस १ जानेवारीला का साजरा केला जातो?

रोमन हुकूमशहा ज्युलियस सीझरने पहिल्या शतकाच्या अखेरीस सत्तेत आल्यानंतर लगेचच दिनदर्शिकेत सुधारणा केली. परंतु, नवीन ज्युलियन कॅलेंडर लोकप्रिय होऊनही युरोपच्या मोठ्या भागात १६ व्या शतकाच्या मध्यापर्यंत त्याला समाजमान्यता मिळाली नाही.

पॉप ग्रेगरी यांनी ज्युलियन दिनदर्शिकेत सुधारणा करून १ जानेवारी हा नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून निश्चित केला. तेव्हापासून त्याला मान्यता मिळण्यास सुरुवात झाली आणि अखेरीस ते जगन्मान्य झाले.