Meaning of Mumbai Name : महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई या शहराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या या शहराच्या सौंदर्याची तुलना आपण कोणत्याही इतर शहराबरोबर करू शकत नाही. दर दिवशी हजारो लोक मुंबईत शिक्षणासाठी, नोकरी किंवा व्यवसायासाठी येतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कित्येकांना मुंबईने आपल्यात सामावून घेतले आहे. कित्येकांची स्वप्ने पूर्ण केली आहेत. (what is the meaning of Mumbai name by reading meaning of city name mumbai you will get surprise)
असं म्हणतात, एकदा कोणी या शहरात आले की लोक मुंबईच्या प्रेमात पडतात. पण, तुम्हाला माहीत आहे का अनेक लोकांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या ‘मुंबई’ या शहराच्या नावाचा अर्थ काय? मुंबई शब्दाचा नेमका अर्थ काय? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
मुंबई शब्दाचा नेमका अर्थ काय?
मुंबई शहराचे नाव मुंबादेवी या देवतेच्या नावावरून पडले असे म्हणतात, पण तरी मुंबई या शब्दाचा अर्थ काय तुम्हाला माहितीये का? सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये मिलिंद शिंत्रे सांगतात की, मुंबई या शब्दाचा अर्थ बेपत्ता होणे, असा आहे. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण, हे खरंय.
हेही वाचा : दरवर्षी मुंबईची तुंबई का होते? मुंबईत येणाऱ्या पुराचा मिठी नदीशी काय आहे संबध? जाणून घ्या
काय म्हणाले मिलिंद शिंत्रे?
मिलिंद शिंत्रे सांगतात, “महाराष्ट्रातलं सर्वात प्रसिद्ध आणि मोठं शहर कुठलं? मुंबई, मग मुंबईचा अर्थ काय? मुंबादेवीवरून मुंबई हे नाव पडलं, हे वेगळं. पण, मुंबईचा अर्थ काय? मुंबईचा अर्थ बेपत्ता होणे. बघा आदर्श मराठी शब्दकोश, संपादक प्र. न. जोशी. अकराशे पानी शब्दकोश आहे. मराठीमध्ये जे तीन शब्दकोश आहे, जे प्रमाण मानले जातात. १. दाते कर्वे शब्दकोश, २. प्र. न. जोशींचा आदर्श मराठी शब्दकोश ३. शासनाचा शब्दकोश या तिन्ही शब्दकोशांमध्ये मुंबईचा अर्थ बघा, बेपत्ता होणे.”
पाहा व्हायरल व्हिडीओ
हेही वाचा : Mameru Ceremony : अँटिलियात साजरा झालेला मामेरू समारंभ काय आहे? मामासाठी का असतो हा सोहळा महत्त्वाचा!
mitramhane_podcast या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. खूप कमी लोकांना कदाचित हा अर्थ माहिती असावा. यानंतर जर तुम्हाला कोणी मुंबईचा अर्थ विचारला तर तुम्ही नक्की मुंबईचा हा हटके अर्थ सांगू शकाल.