What is the meaning of PNR: भारतीय रेल्वे हे जगातील आणि आशियातील चौथ्या क्रमांकाचे मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतीय रेल्वेतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. पण, जेव्हा तुम्ही प्रवासासाठी तिकीट बुक करता तेव्हा त्यात एक पीएनआर क्रमांक असतो. या पीएनआर क्रमांकाचा नेमका अर्थ काय हे तुम्हाला माहीत आहे का?

भारतीय रेल्वे ही आज देशभरातील लोकांची जीवनवाहिनी आहे. अनेकदा एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी लोक ट्रेनचे तिकीट आधीच काढून ठेवण्यास प्राधान्य देतात. आयत्यावेळी ट्रेनमध्ये गर्दी मिळू नये आणि आपल्याला आरक्षित सीट मिळावी यासाठी काही महिन्यांअगोदरच ते रेल्वे तिकीट बूक करून ठेवतात. पण, तिकीट बूक केल्यानंतर तुम्ही कधी त्या तिकिटाचं निरीक्षण केलंय का? त्यातला पीएनआर क्रमांक नेमका काय आहे, त्यात प्रवाशाची नेमकी कोणती माहिती दडलेली असते? हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? नाही, चला तर मग या लेखातून आपण PNR क्रमांकाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Aai Kuthe Kay Karte
अरुंधतीचं पूर्ण नाव काय? प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीने दिलं एकदम करेक्ट उत्तर, पाहा व्हिडीओ
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Abhijeet Guru
“लेखकांना मान कमी…”, अभिजीत गुरूने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला…
people born on these date can become a good leader
‘या’ तारखेला जन्मलेले लोक बनतात चांगले राजकीय नेते, राजकारणात कमवतात नाव
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
Bigg Boss 18 hrithik roshan life coach arfeen khan Evicted from salman khan
Bigg Boss 18: हृतिक रोशनच्या लाइफ कोचला दाखवला ‘बिग बॉस’च्या घराबाहेरचा रस्ता, ‘हे’ सदस्य झाले सुरक्षित
Numerology: People Born on These Dates Are Blessed by Lord Shani
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी शनि देवाची कृपा
Thane Passengers loot rickshaw, Thane rickshaw meter, Thane, rickshaw meter,
ठाणे : रिक्षाच्या मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांची लूट

हेही वाचा… तमिळनाडूच्या ‘या’ गावात चप्पल किंवा शूज घालण्यास आहे बंदी, गावकरी चालतात अनवाणी; त्यांची श्रद्धा आहे की…

जरी बहुतेक लोकांनी पीएनआर नंबरचे नाव ऐकले असेल तरी खूप कमी प्रवाशांना माहीत आहे की, हा १० क्रमांकाचा PNR त्यांच्या प्रवासात त्यांना खूप मदत करू शकतो.

PNR क्रमांकाचा अर्थ काय?

PNR क्रमांकाचा फुल फॉर्म म्हणजे पॅसेंजर नेम रेकॉर्ड (Passenger Name Record). या नावावरून आपल्याला कळलं असेल की या नंबरवर प्रवाशांची सर्व माहिती नोंदवली जाते. हा क्रमांक प्रवाशांसाठी रिझर्वेशनच्या वेळीच तयार केला जातो.

PNR नंबरवरून मिळते ही माहिती

तुमची कन्फर्म सीट जाणून घेण्यासाठी तुम्ही पीएनआर नंबरची मदत घेऊ शकता. हा क्रमांक जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम IRCTC वेबसाइटवर क्लिक करा. यानंतर तुम्ही ऑनलाइन पीएनआर नंबर या पर्यायावर क्लिक करून माहिती मिळवू शकता. याशिवाय तुम्ही मोबाइलवर एसएमएसद्वारे पीएनआर नंबरच्या मदतीने ट्रेनची स्थिती जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमचा पीएनआर क्रमांक रेल्वे क्रमांक १३९ वर पाठवावा लागेल.

हेही वाचा… स्विमिंग पूलमध्ये निळ्याच टाइल्सचा का होतो वापर? तुम्हाला कधी पडलाय का प्रश्न? मग जाणून घ्या यामागचं खरं कारण

PNR चे १० क्रमांक

PNR मधल्या १० अंकांपैकी पहिले तीन आकडे सांगतात की प्रवाशाने कोणत्या झोनमधून रिझर्वेशन केले आहे. उदाहरणार्थ, मुंबईचा झोन क्रमांक ८ आहे आणि तुमचं रिझर्वेशन मुंबई ते दिल्ली आहे, तर तुमचा पीएनआर क्रमांक ८ पासून सुरू होईल. यातील उर्वरित दोन क्रमांकदेखील झोनबद्दल सांगतात. यानंतर ७ नंबरमध्ये ट्रेनचा क्रमांक, प्रवासाची तारीख, प्रवाशांचे तपशील इत्यादी माहिती टाकली जाते. याबरोबरच तुमचा प्रवास कोणत्या स्थानकावरून सुरू होईल आणि तो कुठे संपेल, याची माहितीही या क्रमांकांमध्ये देण्यात येते. AC 1, AC 2, AC 3, Sleeper याप्रमाणे तुम्ही कोणत्या वर्गात प्रवास करत आहात याची माहितीही त्यात नोंदवली जाते.