Dunki Meaning : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान नवनवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पठाण, जवान या हिट चित्रपटांनंतर आता शाहरुख खान डंकी या बहुचर्चित चित्रपटात दिसणार आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या डंकी या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटात शाहरुखबरोबर तापसी पन्नू, विक्की कौशल, बोमन इराणी, विक्रम कोचर व अनिल ग्रोवर हेसुद्धा चांगल्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘डंकी’चे टीझर प्रदर्शित झाल्यापासून सगळीकडे या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर, टीझर चांगलेच व्हायरल होत आहे. अनेक जण सोशल मीडियावर या चित्रपटाचे नाव म्हणजेच ‘डंकी’चा अर्थ विचारत आहेत. तुम्हाला ‘डंकी’चा अर्थ माहीत आहे का? डंकी म्हणजे नेमके काय?

सोशल मीडियावर डंकी नावाच्या अर्थावरून चांगलीच चर्चा रंगल्याने आता शाहरुखने स्वत: ‘डंकी’चा अर्थ सांगितला आहे. शाहरुख खानने एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे. शाहरुख लिहितो, “सर्व जण विचारताहेत म्हणून सांगतो. ‘डंकी’चा अर्थ होतो आपल्या लोकांपासून दूर राहणे आणि जेव्हा आपले लोक जवळ असतात तेव्हा वाटते की, त्यांच्याबरोबर शेवटच्या क्षणापर्यंत बरोबर राहावे.”
या पोस्टमध्ये शाहरुखने ‘डंकी’चे प्रमोशनल गाणे ‘ओ माही’ लवकरच येणार असल्याचे सांगितले आहे. त्याबरोबरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखसुद्धा सांगितली आहे.

शाहरुखच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “डंकी हा या वर्षाचा सर्वांत मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरणार आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “आता अर्थ जाणून घेतल्यानंतर आम्ही ‘डंकी’ चित्रपट पाहायला उत्सुक आहोत.” अनेक युजर्सनी शाहरुखच्या लूकचे कौतुक केले आहे.

हेही वाचा : Christmas in December : ख्रिसमस हा सण डिसेंबरमध्येच का साजरा केला जातो?

‘डंकी’चा अर्थ

शाहरुखच्या या पोस्टनंतर अनेकांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे आणि ‘डंकी’चा नेमका अर्थ काय आहे, हे कळले आहे. डंकी म्हणजे आपल्या जवळच्या लोकांपासून दूर जाणे होय. याला इंग्रजीत ‘DUNKI’ असे संबोधले गेले आहे.

राजकुमार हिरानी यांनी मुन्नाभाई एमबीबीएस, पीके, संजू, थ्री इडियट्स यांसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. चतुरस्र दिग्दर्शक म्हणून त्यांची एक ओळख आहे. आता त्यांच्या डंकी या चित्रपटाकडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहेत.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the meaning of word dunki a new movie name of bollywood actor shahrukh khan bollywood movie name mystery ndj