गूळ हा शरीरासाठी पौष्टिक आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. अनेक घरांमध्ये रोज गूळ खाल्ला जातो. भारतात गुळाकडे केवळ गोड पदार्थ म्हणूनच नाही, तर आयुर्वेदिक आणि साखरेला पर्याय म्हणूनही बघितले जाते. आजकाल अनेक मिठाईमध्ये गुळाचा वापर केला जातो. गुळाच्या मिठाईंना बाजारात जास्त मागणी आहे. बरेच लोक फक्त गूळ वापरण्यास प्राधान्य देतात. गुळाचा वापर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, जेवणात साखरेऐवजी गुळाचा वापर केला तर शरीर निरोगी राहिते. पण, दैनंदिन वापरातील हा गूळ कसा बनवला जातो हे फार कमी लोकांना माहिती आहे.
हेही वाचा- समुद्राचे पाणी खारट का असते? पाण्यात एवढं मीठ कुठून येते
साखरेचा वापर सामान्यतः अन्नपदार्थांमधील गोडवा वाढवण्यासाठी केला जातो. परंतु, अनेक लोक चांगल्या आरोग्यासाठी साखरेऐवजी गूळ वापरण्याचा सल्ला देतात. महत्त्वाचे म्हणजे साखऱ आणि गूळ दोन्ही ऊसापासूनच तयार होतात. खजुरापासूनही गूळ तयार केला जातो, परंतु भारतात ऊसापासून बनवलेला गूळ अधिक लोकप्रिय आहे. उत्तर भारतात गुळाचा अधिक वापर केला जातो. भारतात ऊसाला नगदी पीक म्हणून संबोधले जाते. भारतात वर्षभर ऊसाचे उत्पादन घेतलं जातं. ऊसाचा वापर प्रामुख्याने साखर उत्पादनासाठी केला जातो, पण याच ऊसापासून गूळही बनवला जातो. एवढंच नाही, तर उन्हाळ्यात ऊसाच्या रसाला चांगली मागणी असते.
हेही वाचा- चक्रीवादळ आल्यानंतर पाऊस का पडतो? काय आहे यामागचे कारण? घ्या जाणून….
गूळ बनवण्याची नेमकी पद्धत काय?
शेतातून ऊस तोडल्यानंतर तो ऊस गूळ तयार करणाऱ्या कारखान्यात आणला जातो. त्यानंतर कारखान्यातील क्रशरमध्ये तो ऊस घालून क्रश केला जातो. या ऊसातून जो रस निघतो, त्याला सगळ्यात पहिल्यांदा फिल्टर केले जाते. त्यानंतर फिल्टर केलेला रस मोठ्या कढईत ठेवला जातो आणि त्याला उकळले जाते. रसाला उकळी यायला सुरुवात झाली की त्यात पांढरा फेस दिसायला लागतो. प्रत्यक्षात हा फेस रसातली घाण असते, जी वेगळी होत असते. उसाचा रस उकळण्याची प्रक्रिया एकाच भांड्यात होत नाही, तर अनेक भांड्यांमध्ये होते. उकळल्यामुळे रस घट्ट होऊन त्याचा रंग गडद तपकिरी आणि पिवळा होतो आणि शेवटच्या पातेल्यात तो चांगला शिजतो आणि छान सुवासिक पेस्टच्या रूपात दिसू लागतो.
हेही वाचा- Christmas in December : ख्रिसमस हा सण डिसेंबरमध्येच का साजरा केला जातो?
रस घट्ट झाल्यानंतर ती जाड पेस्ट एका भांड्यात ओतून थंड करायला ठेवली जाते. पेस्ट थंड झाली की ती घट्ट होते आणि यालाच म्हणतात गूळ. गुळाला आकार देण्यासाठी निरनिराळ्या पात्रांचा वापर केला जातो. आजकाल बाजारात बर्फीसारख्या पातळ कापांमध्ये गूळ उपलब्ध आहे.
हेही वाचा- Christmas in December : ख्रिसमस हा सण डिसेंबरमध्येच का साजरा केला जातो?
गूळ अनेक स्वरूपात विकला जातो, त्यामुळे तो तयार करताना कारखान्यातच त्यात अनेक गोष्टी मिसळल्या जातात. काही ठिकाणी गुळात गोड सोडा मिसळला जातो, तर काही लोक बदाम, काजू इत्यादी ड्रायफ्रुट्स टाकून त्याची विक्री करतात. अनेक कारखाने थेट गूळ गजक बनवून विकतात. हा गूळ आरोग्यासाठी चांगला मानला जातो. या गुळाच्या सेवनाने शरीरात ऊर्जा निर्माण होते, रक्त शुद्ध होते आणि वाढतेही. तसेच शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण होते. हा गूळ सर्दी कमी करण्यासाठी उपयुक्त मानला जातो.