Types Of Dustbin In India : घरात साफसफाई करणे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाचा भाग आहे. स्वच्छ भारत मिशननुसार भारत सरकारचं स्वच्छता अभियान वेगानं काम करताना दिसत आहे. घरातील केर कचरा डस्टबिनमध्ये टाकण्याच्या सूचना नेहमीच दिल्या जातात. रस्त्यावर किंवा इतर कोणत्या ठिकाणी कचरा फेकल्यास दंडात्मक कारवाईलाही सामोरं जावं लागतं. स्वच्छतेच्या बाबतीत काही ठिकाणी कठोर नियमावली आहे. सकाळी सफाई कर्मचारी जेव्हा कचर जमा करण्यासाठी येतो, त्यावेळी त्याच्यासोबत निळ्या आणि हिरव्या रंगाचं डस्टबीन असतं. ओला आणि सुक्या कचऱ्याबाबत तुम्ही नेहमीच ऐकत असाल. ओला कचरा हिरव्या रंगाच्या डस्टबीनमध्ये आणि सुका कचरा निळ्या कचरा निळ्या रंगाच्या डस्टबीनमध्ये टाकला जातो. पण तुम्ही रुग्णालयात गेल्यावर तुम्हाला पाच वेगवेगळ्या रंगांचे डस्टबीन पाहायला मिळतात. त्यामुळे आता आम्ही तु्म्हाला डस्टबीनच्या कलर कोडबाबत सांगणार आहोत. कोणत्या रंगाच्या डस्टबीनमध्ये कशाप्रकारचा कचरा टाकला जातो, याबात जाणून घ्या सविस्तर माहिती.
लाल रंगाची डस्टबीन
लाल रंगाच्या डस्टबीनचा वापर रक्ताच्या पिशव्या, लघवीच्या पिशव्या, ट्यूबिन, ग्लब्स, आईवी सेट, सिरिंज आणि दुसऱ्या इंफेक्टेड गोष्टी फेकण्यासाठी या डस्टबीनचा वापर केला जातो. पॅथोलॉजी आणि ऑपरेशन थिएटरमध्ये वापरण्यात आलेल्या वस्तूंना लाल रंगाच्या डस्टबीनमध्ये फेकलं जातं.
पिवळ्या रंगाची डस्टबीन
पिवळ्या रंगाच्या डस्टबीनचा वापर ह्यूमन टिशूज, ह्यूमन प्लेसेंटा (बाळाची नाळ), पट्टी आणि रक्तात माखलेल्या सुईला फेकण्यासाठी केला जातो.
काळ्या रंगाची डस्टबीन
बायोमेडिकल कचऱ्याला फेकण्यासाठी काळ्या रंगाच्या डस्टबीनचा वापर केला जातो. यामध्ये बॅटरी, बेबी डायपर, सेनेटरी पॅड्स आणि एक्सपायर झालेल्या औषधाला फेकलं जातं. याशिवाय ब्यूटी प्रोडक्ट आणि केमिकलयुक्त वस्तू फेकल्या जातात.
नक्की वाचा – पिवळ्या रंगाच्या बोर्डवर का लिहिले जाते रेल्वे स्टेशनचे नाव? जाणून घ्या यामागचे कारण
निळ्या रंगाची डस्टबीन
निळ्या रंगाच्या डस्टबीनचा वापर सुक्या कचऱ्याला फेकण्यासाठी केला जातो. यामध्ये प्लास्टिकचा सामान, पिझ्झा बॉक्स, मेटल, जार आणि प्लास्टिकच्या इतर वस्तू टाकल्या जातात. याशिवाय प्लास्टिक बॉटल, चिप्सचा पॅकेट आणि दुधाच्या रिकाम्या पिशव्या निळ्या रंगाच्या डस्टबीनमध्ये टाकल्या जातात.
हिरव्या रंगाची डस्टबीन
हिरव्या रंगाच्या डस्टबीनचा वापर ओला कचरा फेकण्यासाठी केला जातो. यामध्ये भाजीचे छिलके, चहाची पावडर, शिळं अन्न आणि खराब झालेली फळं तसंच इतर सामान फेकलं जातं. याशिवाय सुकलेली फुलंही या डस्टबीनमध्ये टाकली जातात.