गणपती हे आपल्या महाराष्ट्राचंच नाही तर अवघ्या देशाचं अराध्य दैवत. गणपतीवर श्रद्धा नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. अनेक जण चतुर्थीचा उपवासही करतात. चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. अंगारकीचा उपवास करणारे आणि त्यादिवशी रांग लावून गणपतीचं दर्शन घेणारे भाविक आजही आपल्याला दिसतात. मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी म्हटलं जातं त्यामागे एक कारण आहे. काय कारण आहे ते आपण जाणून घेऊ.
संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी कधी आणि का म्हटलं जातं?
संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी हे म्हटलं जातं. यामागचं कारणही तसंच आहे. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह. अंगारक हा संस्कृत शब्द आहे. अंगारक हा ग्रह तांबूस लालबुंद रंगाचा. तो अग्नीसारखा आहे असा समज आहेच. अनेकदा मुलीचं लग्न जमवताना किंवा मुलाचं लग्न जमवताना मंगळ आहे का? कडक मंगळ आहे की सौम्य आहे हे आजही पाहिलं जातंच. तर असं हे अंगारक नाव मिळालं मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला. वद्य पक्षात मंगळवारी येणारी चतुर्थी म्हणजे अंगारकी. अंगारकी चतुर्थीला कडक उपास करणारेही गणेशभक्त आहेत.
हे पण वाचा- नाना पाटेकर अशोक सराफ यांना म्हणाले होते, “पैसेच परत करतोय रे, ती वेळ…”
अंगारक या शब्दाचा पेशवाईत मजेशीर उल्लेख
अंगारक शब्दाचा पेशवाईत एक मजेशीर उल्लेख आढळतो. गोवळकोंड्याच्या सिद्दीला अंगारक म्हटलं आहे. सिद्दी दिसायला काजळासारखा होता. त्यामुळे त्याच्या रंगावरुन नाही पण त्याच्या रागीट स्वभावरुन त्याला अंगारक म्हटलं गेलं असावं. पेशवे कालीन पत्रांमध्ये हा उल्लेख आढळतो.
सदानंद कदम लिखित कहाणी शब्दांची मराठी भाषेच्या जडणघडणीची या पुस्तकात हा सविस्तर अर्थ दिला आहे. आता गणपतीची अंगारकी चतुर्थी म्हणजे काय? हे जर तुम्हाला कुणी विचारलं तर तुम्ही हे नक्की सांगू शकता. अंगारकी चतुर्थीचं महत्त्व असतंच. पण अनेकदा असं होतं की अंगारकी का म्हटलं गेलं आहे? हे माहीत नसतं. मागची पिढी महत्व सांगत आली, पुढची पिढी ते तसं वागत आली हेच घडत गेलं आहे. मात्र आता कुणी अर्थ विचारला तर तुम्ही तो चटकन सांगू शकता यात शंका नाही.