World Cup 2023, Angelo Mathews Timed Out in Bangladesh vs Srilanka: वर्ल्डकप २०२३मध्ये श्रीलंकेच्या संघाला फारची चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे इंग्लंडच्या संघासोबतच श्रीलंकाही गुणतालिकेत तळाच्या स्थानी राहिला. भारताविरुद्ध ३०३ धावांनी पराभव झाल्यानंतर आख्खं श्रीलंका क्रिकेट बोर्डच बरखास्त करण्यात आलं. त्यामुळे यंदाचा विश्वचषक श्रीलंका संघाला या नकारात्मक गोष्टींसाठीच कायम आठवणीत राहण्याची शक्यता अधिक आहे. पण त्याचबरोबर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अँजेलो मॅथ्यूज ज्या प्रकारे बाद झाला, ती गोष्ट श्रीलंकेच्या संघालाच नाही, तर स्वत: मॅथ्यूजलाही पुढची अनेक वर्षं टोचत राहील हे नक्की. कारण अँजेलो मॅथ्यूज या सामन्यात Time Out झाला! क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा फलंदाज टाईम आऊट पद्धतीने बाद झाला आहे.

नेमकं काय घडलं?

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्यात २४व्या ओव्हरमध्ये समरविक्रमा बाद झाला. त्यानंतर अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीसाठी मैदानात आला. पण बॅटिंगला सुरुवात करणार तेवढ्यात त्याला त्याच्या हेलमेटमध्ये काहीतरी समस्या जाणवली. त्यानं तातडीने पॅव्हेलियनमध्ये दुसरं हेलमेट मागवलं. हेलमेट आलंही. पण ते घालून मॅथ्यूज पुन्हा बॅटिंग करण्याआधीच शाकिब अल हसननं अम्पायरकडे आऊटचं अपील केलं होतं आणि अम्पायरनंही मॅथ्यूजला आऊट दिलं होतं! हे पाहून सगळेच चक्रावले होते. पण तिकडे बांगलादेशचे खेळाडू आणि विशेषत: शाकिब अल हसन मात्र खुश होते. कारण श्रीलंकेचा धडाकेबाज खेळाडू एकही चेंडू न खेळता अगदी स्वस्तात माघारी परतला होता.

aayushman khurana
आयुष्मान खुरानाचा ताहिराबरोबर झाला होता ब्रेकअप; ‘हे’ होते कारण, अभिनेत्याने स्वत:चं केला खुलासा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
CCI probe finds Zomato, Swiggy violating competition norms
स्पर्धा आयोगाकडून चौकशीवर अंतिम निवाडा आला नसल्याचा दावा
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
Asaduddin Owaisi Statement over Modi
Asaduddin Owaisi : “आंबेडकर जिंदा है तो गोडसे…”, असदुद्दीन ओवैसींची पंतप्रधान मोदींच्या विधानावर जोरदार टीका

हे घडलं कसं?

हे सगळं घडलं ते क्रिकेटच्या एका नियमामुळे. एमसीसी अर्थात मेलबर्न क्रिकेट क्लबकडून क्रिकेटची नियमावली तयार केली जाते. आपण क्रिकेटमध्ये सध्या पाहात असलेले वाईड बॉल, विकेट, एलबीडब्ल्यू असे क्रिकेटशी संबंधित सर्व नियम एमसीसीच तयार करत असते. लंडनच्या लॉर्ड्समध्ये एमसीसीचं कार्यालय आहे. दर काही वर्षांनी एमसीसी या नियमावलीत भर घालत असते किंवा जुने कालबाह्य ठरलेले नियम रद्द करत असते. एमसीसीच्या नियमावलीची तिसरी प्रत १ ऑक्टोबर २०२२ पासून अंमलात आली असून त्यातील ४०.१ क्रमांकाच्या नियमानुसार अम्पायरनं अँजेलो मॅथ्यूजला बाद दिलं.

काय आहे Time Out चा नियम?

एमसीसीच्या नियमावलीनुसार, एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा दुखापतग्रस्त झाल्यामुळे बाहेर गेल्यानंतर पुढच्या तीन मिनिटांत पुढच्या फलंदाजाने मैदानात थेट क्रीजवर येऊन फलंदाजी करण्यासाठी तयार राहायला हवं. जर यादरम्यान अतिरिक्त वेळेची मागणी अम्पायरच्या परवानगीने किंवा संमतीने करण्यात आली असेल, तर ते विचारात घेतलं जातं. मात्र, तसं नसल्यास तीन मिनिटांच्या आत फलंदाज सर्व तयारी करून चेंडू खेळण्यासाठी क्रीझवर उपस्थित असायला हवा.

आयसीसीतर्फे आयोजित प्रत्येक स्पर्धेसाठी प्लेइंग कंडिशन्स अर्थात नियमावली नव्याने तयार केली जाते. मूळ नियम आणि स्पर्धेसाठीचे नियम यात बदल असू शकतो. त्यानुसार आयसीसी वर्ल्डकप २०२३ प्लेइंग कंडिशन्स अन्वये, फलंदाज बाद झाल्यानंतर नव्या येणाऱ्या फलंदाजाने २ मिनिटात चेंडूचा सामना तयार करण्यासाठी सज्ज असणं अपेक्षित आहे. श्रीलंका-बांगलादेश सामन्याचे पंच अँड्रियन होलस्टॉक यांनी यासंदर्भात प्रक्षेपणकर्त्या वाहिनीला माहिती दिली. त्यामुळे मॅथ्यूजकडे तीन नव्हे तर दोनच मिनिटं होती. तो तेवढ्या वेळात खेळण्यासाठी तयार नसल्याने पंचांनी त्याला बाद देण्याचा निर्णय घेतला.

Wide Ball Rules in Cricket: अम्पायर वाईड बॉल कधी देऊ शकतात, कधी नाही? विराटच्या बाबतीत योग्य निर्णय झाला का? जाणून घ्या!

मॅथ्यूजच्या बाबतीत इथेच गोंधळ झाला. मॅथ्यूज मैदानावर आला खरा. क्रीझवरही उभा राहिला. पण नेमकं तेव्हाच त्याला त्याच्या हेलमेटची पट्टी निसटल्याचं लक्षात आलं. त्यावर त्यानं डगआऊटमधून दुसरं हेलमेट मागवलं. तोपर्यंत बराच वेळ गेला. यादरम्यान शाकिब अल हसननं टाईम आऊटचं अपील केलं. दोन्ही अम्पायर्सनं नियमाचा आढावा घेतला आणि मॅथ्यूजला आऊट दिलं.

सामनाही गमवावा लागू शकतो!

दरम्यान, काही कारणास्तव अतिरिक्त वेळ मागण्यात आला आणि त्यातही फलंदाज क्रीजवर चेंडू खेळण्यासाठी तयार राहू शकला नाही, तर अम्पायर त्या स्थितीत सामना समोरच्या संघाला बहालही करू शकतात. एमसीसीच्या नियमावलीत नियम क्रमांक १६.३ मध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे.