Did You Know: अमेरिकन फिल्म इंडस्ट्री हॉलिवूड, हिंदी चित्रपट सृष्टीला बॉलिवूड, साऊथ फिल्म्सला टॉलिवूड अशी नावे आता प्रचलित आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का १९३० पर्यंत भारतीय चित्रपट हे केवळ हिंदी चित्रपट सृष्टी या एकाच कॅटेगरीमध्ये गृहीत धरले जात होते. इतकंच नव्हे तर बॉलिवूड हा शब्दच तेव्हा जन्माला आला नव्हता. कोट्यवधींचा व्यापार असणाऱ्या या हिंदी चित्रपट सृष्टीला बॉलिवूड हे नाव कसे मिळाले आणि मुळात बॉलिवूड, हॉलिवूड मधील वूड म्हणजे काय? हे आज आपण जाणून घेणार आहोत..
बॉलिवूड हे नाव कसे पडले?
सर्वात आधी सुरुवात करून बॉलिवूडपासून तर बॉलीवुड हा शब्द हा ‘बॉम्बे’ या शब्दापासून आला आहे आणि त्याच्यापुढे हॉलीवुड शब्दामधील वुड हा शब्द वापरण्यात आला आहे. B चा अर्थ बॉम्बे यानुसार मुंबईत बनणाऱ्या चित्रपटांना बॉलिवूड मूव्ही म्हणून ओळखले जाणे हे अपेक्षित होते. साधारण ७० च्या दशकापर्यंत सर्वच हिंदी चित्रपटांसाठी बॉलिवूड हे नाव प्रसिद्ध झाले होते.
टॉलिवूड हे नाव कसे पडले?
१९३० साली कोलकात्याचा बंगाली चित्रपट उद्योग ‘टॉलीगंज’ नावाच्या परिसरात होता. ज्युनियर स्टेट्समन नावाच्या मासिकाने पहिल्यांदाच याबद्दल लिहिताना ‘टॉलिवूड’ हा शब्द वापरला. पण, आज दाक्षिणात्य चित्रपटांसाठी टॉलिवूड हा शब्द वापरला जातो.
हॉलिवुड हे नाव कसं पडलं?
व्यावसायिक एच.जे. व्हिटली (H.J. Whitley) यांना हॉलिवूडचे फादर म्हटले जाते. त्यांनीच अमेरिकेच्या चित्रपटसृष्टीला ‘हॉलिवूड’ हे नाव दिले. ‘हॉलीवूड’ हे अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरातील एका ठिकाणाचे नाव आहे. व्हिटली यांनी ‘हॉलीवूड’ हे ठिकाणाचे नाव तेथील चित्रपटसृष्टीला दिले.
तर आता बॉलिवूड, हॉलिवूड, टॉलिवूड या सगळ्यांमध्ये कॉमन असणारा वूड हा शब्द कशावरून आला हे जाणून घेऊयात. याचे सोपे उत्तर म्हणजे हॉलिवूड या जागेच्या नावावरूनच वूड हा शब्द वापरला गेला, बॉलिवूडने जसं हॉलिवूड मधील H च्या जागी B वापरला तसा विविध भाषेतील चित्रपटांसाठी भाषा किंवा त्या प्रांतातील प्रसिद्ध गोष्टीच्या मागे वूड हा एक कॉमन शब्द घेऊन पुढे वेगवेगळे शब्द जोडण्यात आले. उदाहरणार्थ..
- ओडिशातील ऑलिवुड ते ओडिया भाषेतील चित्रपट उद्योग.
- केरळमधील मल्याळम चित्रपट उद्योगासाठी मॉलीवुड.
- तमिळ सिनेमासाठी कॉलिवुडचा वापर केला जातो.
- कर्नाटकातील कन्नड भाषेतील चित्रपट उद्योगासाठी सॅण्डलवूड .
- सिंधी फिल्म इंडस्ट्रीसाठी सॉलिवुड.
- उर्दू आणि पंजाबी चित्रपटांसाठी लॉलीवुड
- ढाका शहरावर आधारित बांगलादेशी चित्रपट उद्योगासाठी धल्लीवुड किंवा धालीवुड.
- कराची शहरावर आधारित पाकिस्तानी चित्रपट उद्योगासाठी करीवूड .
- काठमांडू शहरावर आधारित नेपाळ सिनेमासाठी कालीवुड.
- पंजाब किंवा पश्तो सिनेमासाठी पॉलिवुड.