Indian Railways : भारतीय रेल्वेने रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. याला जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क म्हटले जाते. भारतातील १७ झोनमध्ये १९ हजारांहून अधिक ट्रेन धावतात. या १९ हजार रेल्वे गाड्या विविध श्रेणींमध्ये विभागल्या आहेत. इमू आणि मेमू ट्रेनचाही यात समावेश होतो. भारतीय रेल्वे आपल्या गरजेनुसार, वेगवेगळ्या श्रेणीतील ट्रेनचा वापर करते. पण तुम्हाला या EMU, DEMU आणि MEMU ट्रेन कशा असतात, त्यांचा कधी, कुठे आणि कसा वापर होतो जाणून घेऊ. यासोबत या तीनही रेल्वे गाड्यांमधील फरक काय आहे तोही समजून घेऊ…
मेमू (MEMU) गाड्या नेमक्या कशा असतात?
मेमू म्हणजे मेन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट. या ट्रेन हाय टेक्नॉलॉजी आणि ॲडव्हान्स फीचर्सनी सुसज्ज आहेत. या ट्रेन्स भारतीय रेल्वे २०० किमी पेक्षा जास्त अंतर कापण्यासाठी वापरतात. यात चार कोचसोबत एक पावर कार पण असते. याच्या मदतीने ट्रेनची ट्रॅक्शन मोटर चालते.
एमू (EMU) ट्रेनचा वापर कशासाठी होतो?
एमू ट्रेनचा अर्थ इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट. कोलकाता, मुंबई, दिल्ली आणि चेन्नई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये भारतीय रेल्वेद्वारे या प्रकारची ट्रेन चालवली जाते. मुंबई लोकल ट्रेन हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. या ट्रेनच्या माध्यमातून उपनगरीय भागांना आणि शहरांना जोडले जाते. या ट्रेन विजेवर चालतात आणि त्यांच्यात एक प्रकारचा पॅन्टोग्राफ असतो, जो ट्रेनच्या इंजिनला वीज पोहोचवतो. या ट्रेन ताशी ६० ते १०० किलोमीटर वेगाने धावतात.
हेही वाचा : Petrol Price: भारताच्या तुलनेत जगभरात पेट्रोलचा दर किती आहे माहित्येय? नक्की वाचा…
डेमू (DEMU) ट्रेन म्हणजे काय?
डेमू (DEMU) म्हणजे डिझेल मल्टिपल युनिट. अशा ट्रेन चालवण्यासाठी डिझेलचा वापर केला जातो. या ट्रेन तीन प्रकारच्या आहेत, पहिला डिझेल मेकॅनिकल डेमू, दुसरा डिझेल हायड्रॉलिक डेमू आणि तिसरा डिझेल इलेक्ट्रिक डेमू. या तिन्ही ट्रेन्समध्ये तीन कोचनंतर एक पॉवर कोच असतो, अशा ट्रेन्सना एनर्जी एफिशिएंट ट्रेन्स असेही म्हणतात.