Benefits for Cylindrical Tanks पाणी, दूध, पेट्रोल, डिझेल किंवा इतर द्रव पदार्थ वाहून नेणाऱ्या टँकर्सचा आकार हा बहुतांश वेळी सिलिंडरप्रमाणे असतो. एक विशिष्ट गोलाकार अशी ही रचना असते. एका शहरातून दुसऱ्या शहरांत किंवा शहरांच्या दरम्यान पाणी, दूध किंवा इंधनाची वाहतूक अशा प्रकारच्या खास आकाराच्या टँकरमधूनच केली जाते. यासाठी विशेष कारण काय? हे आपण जाणून घेऊ.

सिलिंडरसारखा आकार द्रव पदार्थ वाहून नेणाऱ्या टँकर्सना का असतो?

सिलिंडरसारखा विशिष्ट गोलाकार दिल्याने या टँकर्समधलं दूध, पाणी किंवा इंधन हे हेंदाकाळत नाही. एका विशिष्ट पातळीवर ते राहण्यास मदत होते.

The work on six water tanks of Pune Municipal Corporation is still not complete Pune print news
सहा टाक्या, तरी पाणी मिळेना! पुण्यातील प्रकार
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Thane district water, MIDC, MIDC water scheme ,
ठाणे जिल्ह्याचे पाणी महागणार ? एमआयडीसीची पाणी योजना तोट्यात, दर वाढवण्याच्या हालचाली
big step by pune municipality to solve water problem in included villages
समाविष्ट गावातीत पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेचे मोठे पाऊल !
demand diesel SUV cars
विश्लेषण : डिझेल एसयूव्ही कार्सच्या मागणीत वाढ का होत आहे?
China is building world largest artificial island
जगातील सर्वांत मोठ्या विमानतळासाठी ‘हा’ देश समुद्रामध्ये तयार करणार कृत्रिम बेट; याची वैशिष्ट्ये काय?
Salt water agriculture Uran , farmers Uran,
खाऱ्या पाण्यामुळे शेती नापिकीच्या मार्गावर, उरणमधील दोन हजार हेक्टर जमीन समुद्राच्या भरतीमुळे धोक्यात ?
almatti dam flood
कर्नाटकच्या कृष्णाकाठ योजनेमुळे पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका

दूध, पाणी, इंधन यांची वाहतूक करण्यासाठी या आकाराचे टँकर्स हे सोयीचे ठरतात.

आयताकृती किंवा चौकोनी आकाराचा टँकर तयार केला तर त्याचा परिणाम हा द्रव वाहतुकीवर होऊ शकतो. गुरुत्वाकर्षणामुळे यातले द्रव पदार्थ हेंदकाळू शकतात, खाली सांडू शकतात.

गोलाकार आकाराच्या किंवा सिलिंडरप्रमाणे असलेल्या टँकर्समध्ये हा धोका नसतो.

आणखी काय कारणं असतात?

सिलिंडरच्या आकाराचे टँकर वापरण्यामागे आणखी एक कारण असतं ते म्हणजे या प्रकारच्या टँकर तयार करताना त्यातली कुठलीही बाजू कमकुवत राहण्याची शक्यता नगण्य असते. चौकोनी किंवा आयताकृती आकाराचा टँकर तयार केला तर एखादी बाजू कमी-जास्त किंवा कमकुवत होण्याची शक्यता असते. गोलाकार भागात हा धोका नसतो. जेव्हा टँकरचा वेग वाढतो तेव्हा त्यातील द्रव पदार्थ हलतो. अशा परिस्थितीत ते खाली सांडण्याचा धोकाही नाकारता येत नाही. गोलाकार, सिलिंडरसारख्या असणाऱ्या टँकरच्या टाक्यांमध्ये हा धोका नगण्य प्रमाणात असतो. आकृतीबद्ध असा गोलाकार देऊन या टाक्या तयार करण्यात आलेल्या असतात. त्यामुळे द्रव पदार्थ वाहून नेणं सोपं ठरतं.

औद्योगिक जगतातून अशा टँकर्सना खास मागणी

अशा प्रकारच्या टँकर्सचा उपयोग द्रव पदार्थांची वाहतूक करण्यासाठी होत असतो. या टँकर्समध्ये द्रव पदार्थ भरणं आणि नंतर ती टँकरची टाकी रिकामी करणं यासाठी विशिष्ट प्रकारची सोय केलेली असते. तसंच हे गोलाकार टँकर्स द्रव पदार्थांच्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरतात त्यामुळेच दूध, पाणी, इंधन नेणाऱ्या टँकर्सच्या टाक्यांचा आकार हा गोलाकार असतो. गोलाकार आकाराच्या टँकर्सना औद्योगिक क्षेत्रात म्हणजेच ज्यांना पाणी, इंधन किंवा द्रव रसायनं मोठ्या प्रमाणात लागतात त्यांच्यासाठी हे टँकर उपयोगी असतात. अशा आकाराच्या टँकर्सना औद्योगिक जगतातून मागणी असतेच. wet1.com.au या वेबसाईटने हे वृत्त दिलं आहे.

Story img Loader