UPI Transaction amount limit : आजच्या डिजीटल युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. त्यामुळे भारतात बहुसंख्य लोक आर्थिक व्यवहारांसाठी यूपीआयचा (Unified Payments Interface) वापर करतात. यासाठीचे अ‍ॅप्स वापरून अगदी काही सेकंदात आपल्या बँक खात्यातील पैसे आपण इतर व्यक्तींच्या, दुकानदारांच्या खात्यात पाठवू शकतो. परंतु, या यूपीआयद्वारे दररोज किती आर्थिक व्यवहार करता येतात? किंवा दिवसाला किती रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येतात? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला यूपीआयबाबतची सर्व महत्त्वाची माहिती देणार आहोत.

यूपीआय म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ही भारतातील एक रिअल-टाइम पेमेंट प्रणाली आहे, जी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) विकसित केली आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे नियंत्रित केली जाते. यूपीआयद्वारे व्यक्ती आपल्या बँक खात्यांमधून तात्काळ पैसे हस्तांतरित करू शकतात, बिल पेमेंट करू शकतात, ऑनलाइन खरेदी करू शकतात आणि इतर आर्थिक व्यवहार करू शकतात. ही प्रणाली भारतात २०१६ पासून सुरू करण्यात आली आहे. ही भारतातील सर्वात लोकप्रिय डिजिटल पेमेंट पद्धतींपैकी एक आहे. यूपीआय अ‍ॅप्स जसे की गूगल पे, फोनपे, पेटीएम व भिमसारख्या अ‍ॅप्सद्वारे यूपीआय पेमेंट करता येतं.

दररोज किती वेळा यूपीआय ट्रान्झॅक्शन करता येतं?

एनपीसीआयने यूपीआय ट्रान्झॅक्शनच्या संख्येवर कोणतीही ठराविक मर्यादा घातलेली नाही. पूर्वी काही बँकांनी स्वतःहून २० ट्रान्झॅक्शनची मर्यादा ठेवली होती. मात्र, आता बहुसंख्य बँका व यूपीआय अ‍ॅप्सनी ही मर्यादा काढून टाकली आहे. त्यामुळे तुम्ही दररोज कितीही वेळा यूपीआय ट्रान्झॅक्शन करू शकता. मात्र, काही बँकांनी या ट्रान्झॅक्शनच्या संख्येवर मर्यादा ठेवली आहे. बँकेच्या धोरणानुसार ही मर्यादा वाढवली अथवा कमी केली जाऊ शकते. गूगल पे, फोनपे सारख्या अ‍ॅप्सनी पूर्वी १० ते २० ट्रान्झॅक्शनची मर्यादा ठेवली होती.

यूपीआय ट्रान्झॅक्शनची मर्यादा किती? (दिवसाला किती रुपयांपर्यंतचे आर्थिक व्यवहार करता येतात)

  • यूपीआय ट्रान्झॅक्शनची मर्यादा एनपीसीआय आणि बँकांच्या धोरणांवर अवलंबून असते.
  • सामान्य ट्रान्झॅक्शन (P2P आणि P2M म्हणजेच person-to-person आणि person-to-merchant)
  • दररोज १,००,००० रुपयांपर्यंत ट्रान्झॅक्शन करता येतं. एका वेळी १,००,००० रुपयांपेक्षा अधिक रक्कम हस्तांतरित करता येत नाही.
    नवीन यूपीआय युजर पहिल्या दिवशी (सुरुवातीच्या २४ तासांत) केवळ ५,००० रुपये हस्तांतरित करू शकतात.
  • रुग्णालये, शैक्षणिक संस्था व कर भरताना (Tax Payments) ५,००,००० रुपयांपर्यंतचं ट्रान्झॅक्शन करता येईल. एका वेळी ५,००,००० रुपयांपेक्षा अधिक रक्कम हस्तांतरित करता येत नाही. १६ सप्टेंबर २०२४ पासून ही मर्यादा लागू करण्यात आली आहे.
  • म्युच्युअल फंड, ब्रोकिंग, विमा, बँकेचा हप्ता (ईएमआय), क्रेडिट कार्ड बिल आणि कर्जाची परतफेड करत असताना यूपीआयवरून दिवसाला २,००,००० रुपये भरता येतील. एका वेळी जास्तीत जास्त २,००,००० रुपये हस्तांतरित करता येतील. मात्र काही बँकांनी यावर मर्यादा घातल्या आहेत. जसे की एसबीआयचे (भारतीय स्टेट बँक) ग्राहक केवळ १,००,००० रुपयेच भरू शकतात. कॅनरा बँकेने, २५,००० रुपये ते १,००,००० रुपयांपर्यंतची मर्यादा घातली आहे. एचडीएफसी व आयसीआयसीआय बँकेने १,००,००० रुपयांपर्यंतची मर्यादा निश्चित केली आहे. ही रक्कम बँकांच्या धोरणानुसार बदलू शकते.

Story img Loader