What To Do If Car Brake Fail: पावसाळ्यात गाड्यांची काळजी न घेतल्यास आपल्या खिशाला चांगलाच फटका बसू शकतो. बाईक- स्कुटी पेक्षा कारने पावसाळ्यात प्रवास करणे सोयीचे ठरते. विशेषतः जर तुम्ही वयस्कर मंडळी, लहान मुले किंवा कुटूंबासह प्रवास करणार असाल तर चारचाकी हा बेस्ट आणि सुखकर पर्याय ठरतो. पण अनेकदा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गाडीमध्ये पाणी जाऊन एखादा पार्ट अचानक बंद पडण्याची शक्यता असते. विशेषतः ब्रेक. प्रवासात अचानक ब्रेक बंद पडल्यास जीव सुद्धा धोक्यात येऊ शकतो, त्यामुळे अशा दुर्दैवी घटनेच्या वेळी काय करावे हे माहीत असणे अत्यावश्यक आहे. आज आपण ५ सोप्या बेसिक टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही परिस्थिती तात्पुरती नियंत्रणात आणू शकता.
- वॉर्निंग लाइट्स
तुमच्या आजूबाजूच्या वाहनांना सावध करण्यासाठी वॉर्निंग लाईट्स सुरु करा व हॉर्न वाजवा. यामुळे तुम्हाला अन्य गाड्या जागा करून देतील व अपघाताची स्थिती टाळता येईल.
- ब्रेक दाबणे थांबवू नका
अनेक अत्याधुनिक गाड्यांमध्ये ड्युअल ब्रेक सिस्टीम दिलेली असते ज्यामुळे तुम्ही मागच्या व पुढच्या चाकांना कंट्रोल करू शकता. तुम्हाला ब्रेकचे पॅडल दाबत राहणे फायदेशीर ठरू शकते कारण यामुळे सिस्टीममध्ये निदान काही प्रमाणात प्रेशर कायम राहून अर्धवट का होईना ब्रेक लागू शकतो. मात्र जर दुर्दैवाने तुमच्या मागच्या व पुढच्या दोन्ही चाकांचे ब्रेक फेल झाले असतील तर मात्र ही हॅक काम करणार नाही.
- हळू हळू गिअर कमी करा
पूर्णतः ब्रेक फेल झाल्यावर अचानक गाडी थांबवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा वेग कमी करायला हवा. यासाठी इंजिन ब्रेक सिस्टीम वापरायला हवी. एक्सलरेटर सोडून हळू हळू आपण गिअर बदलत कमी करायला हवा. ऑटोमेटिक कारमध्ये यासाठी पॅडल शिफ्टर बसवलेले असतात.
- हॅन्ड ब्रेक वापरा
वर म्हटल्याप्रमाणे हळू हळू गिअर कमी करून तुम्ही जेव्हा कारचा स्पीड ४० किमी प्रति तास या मर्यादेपर्यंत आणाल तेव्हा आपण हॅन्डब्रेक वापरून गाडी थांबवू शकता. यावेळी तुमच्या गाडीच्या मागे कोणतीही गाडी किंवा व्यक्ती नसेल याची खात्री करून घ्या.
हे ही वाचा<< किती पगार असल्यावर घर-फ्लॅट घेणे आहे योग्य? ‘हा’ आहे फॉर्म्युला..नाहीतर आयुष्यभर EMI च भरावा लागू शकतो
- गाडी कुठे थांबवावी?
शक्यतो गाडी थांबवता एखाद्या ओली रेती किंवा मातीच्या ठिकाणी थांबवा कारण इथे चाकांचा वेग अगोदरच कमी झालेला असतो. शिवाय चढण किंवा उतरणीवर गाडी थांबवू नका. गाडी थांबवल्यावर लगेचच मेकॅनिकची मदत घ्या.