चुकीने कधी मोबाईल पाण्यात पडला तर अशावेळी नेमकं काय करावं हे अनेकांना समजत नाही. घाई गडबडीत केलेल्या एका चुकीमुळे मोबाईल पूर्णपणे खराब होतो. मोबाईलवर पाणी पडले तर तो लगेचचं खराब होतो असे अनेकांना वाटते, पण असे अजिबात नाही. मोबाईल पाण्यात पडल्यानंतर काही सोप्या ट्रिक्स फॉलो करून तो पुन्हा आहे त्या स्थितीत आणू शकता. यासाठी तुम्हाला काही विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत.

बहुतेक आधुनिक मोबाईलमध्ये एका विशिष्ट लेअरपर्यंत पाणी शोषून घेण्याची क्षमता असते. नवीन आयफोन मॉडेल्स ३० मिनिटांपर्यंत सहा मीटर खोल पाण्यात पडले तरी त्यांना काही होत नाही. त्यामुळे मोबाईल शौचालयात पडला तरी काळजी करण्याचे कारण नसते. पण इतर मोबाईलमधील डिव्हाइस तुम्ही खूप दिवस अपग्रेड केला नसेल तर पुढच्या वेळी तुमचा मोबाईल पाण्यात पडला तर विशेष काळजी घ्यावी लागले.

Tomato soup in winter is good for health Tomato soup recipe in marathi
हॉटेलसारखं परफेक्ट टोमॅटो सूप १० मिनीटांत होईल तयार; थंडीत गरमागरम सूप करा एन्जॉय, सोपी रेसिपी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर

मोबाईल लगेच चालू करू नका.

तुमचा मोबाईल पाण्यात पडला तर तुम्ही तो पाण्यातून बाहेर काढल्यानंतर लगेच चालू करण्याचा प्रयत्न करु नका, असे केल्यास मोबाईल पूर्णपणे बंद होतो. मोबाईल बंद केल्याने सर्व सर्किट पूर्णपणे बंद होतात, यामुळे मोबाईलच्या इंटर्नल भागात पाणी जात नाही. पण मोबाईल चालू केल्यास तो जवळ जवळ पूर्णपणे खराब होईल. मोबाईलमधील बॅटरी, सिम, एसडी कार्ड काढण्यायोग्य असल्यास ते काढावे आणि पूर्णपणे कोरडा करण्याचा प्रयत्न करा.

टिश्यू पेपर किंवा टॉवेल वापरा.

तुमचा मोबाईल पाण्यात पडला तर तो पाण्यातून काढून तो सर्वप्रथम टिश्यू पेपरने पूर्णपणे स्वच्छ करा, यात पाण्याचा एकही थेंब राहणार नाही याची काळजी घ्या. यासाठी तुम्ही टॉवेलचाही वापरू शकता.

हेअर ड्रायरचा वापर करा.

मोबाईलमधील पाणी पूर्णपणे कोरडं करण्यासाठी तुम्ही हेअर ड्रायरचा वापर करु शकता. पण हेअर ड्रायर कूल सेटिंगवर ठेऊन मोबाईलवर वापरा, नाहीतर मोबाईलमधील इंटर्नल भाग खराब होऊ शकतो.

तांदळात ठेवा.

असे म्हणतात की, पाण्यात पडलेला मोबाईल तांदळाच्या डब्यात ठेवल्यास तांदूळ पाणी शोषून घेते. मोबाईल दोन दिवस तांदळाच्या डब्यात ठेवल्यास आणि पुन्हा चालू केल्यास तो सहज चालू होईल. कारण तांदूळ स्मार्टफोनमधील सर्व पाणी शोषून घेते. यासाठी बासमती तांदूळ सर्वोत्तम असल्याचे म्हटले जाते. तांदळात मोबाईल ठेवल्यास काहीही नुकसान होत नाही.

सिलिका जेलचा वापर करा.

मोबाईलमधील पाणी बाहेर काढण्यासाठी सिलिका जेल फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. पण अनेकांच्या घरात ती नसते. सिलिका जेलमध्ये पाण्यात पडलेला मोबाईल ठेवल्यास यातील पाणी लगेच शोषून घेतले जाते.

मोबाईल दुरुस्तीसाठी द्या.

अनेकदा सर्व प्रयत्न करुनही पाण्यात पडलेला मोबाईल पुन्हा चालू होत नाही. अशावेळी तुमच्याकडे मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात देणे हाच शेवटचा पर्याय असतो. मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात दिल्याने एक मोठा फायदा होतो तो म्हणजे मोबाईलमधील सर्व फाइल्स, फोटो आहे त्याच स्थितीत परत मिळवता येतात.

आयपी रेटिंगवरूनही तुम्ही पाण्यात पडलेला मोबाईल किती सुरक्षित राहू शकतो हे जाणून घेऊ शकता. यात नवे आयफोन मॉडेल्स हे चांगल्या आयपी रेटिंगमुळे पाण्यात पडल्यानंतरही सुरक्षित राहतात. तुमच्या मोबाईल पाण्यात पडल्यानंतर तो किती सुरक्षित राहू शकतो हे जाणून घेण्यासाठी डिव्हाइसचे IP रेटिंग तपासा.

Story img Loader