गेल्या काही वर्षांत भारतीय बाजारपेठेचे डिजिटलायझेशन झाले असले तरी, अजूनही काही वेळा प्रत्येकालाच हातामध्ये रोख रक्कम हवी असते. आता, पैसे मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे एटीएममधून पैसे काढणे. पण, नोटा मागे घेतल्या गेल्या, बाजूला किंवा कोपऱ्यातून फाटलेल्या बाहेर आल्या तर?
ही गोष्ट नक्की की बाजारात कोणीही अशा नोटा स्वीकारणार नाही. पण, आता त्याची काळजी करण्याची गरज नाही. कारण आता तुम्ही त्यांची देवाणघेवाण करू शकता. खराब नोटांची देवाणघेवाण करण्यासाठी तुम्हाला ज्या बँकेच्या एटीएममधून रोख रक्कम काढली आहे त्या बँकेत अर्ज करावा लागतो. तुम्हाला एटीएमची तारीख, वेळ आणि स्थान नमूद करावे लागते जिथून तुम्ही पैसे काढले आहेत आणि पैसे काढण्याची स्लिप देखील सोबत जोडावी लागेल.
जर तुमच्याकडे स्लिप नसेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आलेल्या मेसेजचा तपशील द्यावा लागेल.
हेही वाचा – एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमामध्ये १ ऑगस्टपासून बदल; जाणून घ्या अधिक माहिती
आरबीआयच्या नियमानुसार, फाटलेल्या नोटांची देवाणघेवाण करता येत नाही. पण ट्विटरवर वापरकर्त्याच्या तक्रारीला संबोधित करताना या परिस्थितीत ग्राहकांनी काय पावले उचलावीत हे बँकेने सांगितले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सांगण्यात आलं आहे की, “कृपया लक्षात घ्या की आमच्या एटीएममध्ये लोड होण्यापूर्वी नोटा अत्याधुनिक नोट सॉर्टिंग मशीनद्वारे तपासल्या जातात. त्यामुळे मळलेल्या किंवा फाटलेल्या नोटांचे वितरण अशक्य आहे. पण तुम्ही आमच्या कोणत्याही शाखेतून नोटा बदलून घेऊ शकता. ”
एसबीआयच्या मते, एखादी व्यक्ती सामान्य बँकिंग अथवा रोख संबंधित श्रेणी अंतर्गत https://crcf.sbi.co.in/ccf/ या संकेतस्थळावर जाऊन तक्रार दाखल करू शकते. ही लिंक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमसाठी आहे. विशेष म्हणजे, कोणतीही बँक एटीएममधून आलेल्या खराब नोटा बदलण्यास नकार देऊ शकत नाही. असं असूनही बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. ग्राहकांच्या तक्रारीच्या आधारावर बँकेला १०,००० रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देखील द्यावी लागू शकते.