रेल्वेने प्रवास करणे आरामदायी असले तरी कधी कधी प्रवासांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या दूर करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून अनेक सुविधा दिल्या आहेत. यात तुम्हाला घरी बसून आरामात तिकीट बुक करु शकता. पण तरीही प्लॅटफॉर्मवरील तिकीट काउंटरवरुन तिकीट खरेदी करणारे बहुतांश लोक आहेत. अशा परिस्थितीत जर तुमचे रेल्वे तिकीट प्रवासादरम्यान हरवले तर काळजी करण्याची अजिबात गरज नाही. याबाबत आज आम्ही तुम्हाला भारतीय रेल्वेचे नियम सांगणार आहोत.
ट्रेनचे तिकीट हरवले तर काय करावे?
प्रवासापूर्वी जर तुमचे ट्रेनचे तिकीट हरवले तर तुम्ही तिकीट तपासकाकडून नवीन डुप्लिकेट तिकीट मिळवू शकता. मात्र यासाठी तुम्हाला १०० रुपये दंड भरावा लागू शकतो. तिकीट हरवल्यानंतर तुम्ही ताबडतोब तिकीट तपासकाशी संपर्क साधावा आणि संपूर्ण माहिती दिल्यानंतर तिकीट तपासक तुमच्यासाठी नवीन तिकीट बनवू शकेल. जर तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत असाल आणि तुमचे तिकीट हरवले तर तुम्ही आयआरसीटीसी अॅपवर जाऊन TTE ला कोच आणि बर्थचा मेसेज दाखवू शकता. यामु ळे त्यांना कन्फर्मेशनही मिळेल.
याशिवाय जेव्हा तुम्ही ट्रेनचे तिकीट ऑनलाईन बुक करता तेव्हा ते तिकीट तुमच्या मोबाईल नंबर आणि मेल आयडीवर पाठवले जाते. तुमच्या मोबाईलवर PNR कन्फर्मेशनचा मेसेज देखील येतो. तो तुम्ही TTE ला दाखवू शकता. यावरुन कळेल की, तुम्ही ज्या सीटवर बसला आहात ती सीट किंवा बर्थ तुम्ही बुक केली आहे.