WhatsApp Web QR Code Issue: व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया अॅपलिकेशन आहे. गेल्या काही वर्षांमध्ये याच्या वापरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. करोना काळामध्ये लोक खासगी कामांसह व्यावसायिक कामांसाठीही याचा वापर करत होते. तेव्हापासून बहुसंख्य लोकांना कामांसाठी व्हॉट्सअॅपचा वापर करण्याची सवय लागली आहे. व्हॉट्सअॅपसाठी मोबाईल नंबर अनिवार्य असतो. असे असले तरी फोनव्यतिरिक्त लॅपटॉप आणि डेस्कटॉपमध्येही व्हॉट्सअॅपची सेवा वापरता येते. फक्त यासाठी WhatsApp web ची मदत घ्यावी लागते.
आजकाल बऱ्याच कार्यालयांमध्ये व्हॉट्सअॅपचा सर्रास वापर केला जातो. व्हॉट्सअॅप अकाउंट संगणकामध्ये सुरु करण्यासाठी व्हॉट्सअॅप वेबचे QR Code स्कॅन करावे लागते. असे केल्याने चॅट्स मोठ्या स्क्रीनवर पाहता येतात. पण काही वेळेस क्यूआर कोड लोड होत नसल्यास व्हॉट्सअॅप वेब सुरु होताना अडथळा निर्माण होतो. काहीवेळेस इतर गोष्टीमुळे व्हॉट्सअॅप वेब वापरणे शक्य होत नाही. व्हॉट्सअॅपशी संबंधित ही समस्या सोडण्यासाठी काही सोप्या ट्रिक्सची मदत घेता येते.
Built-in WhatsApp QR scanner चा वापर करावा.
व्हॉट्सअॅपमधील क्यूआर कोड हा त्याच्या Built-in QR scanner च्या मदतीने काम करत असतो. या क्यूआर स्कॅनरचा वापर करुन व्हॉट्सअॅप वेब सुरु करता येते असे काही रिसर्चमधून स्पष्ट झाले आहे.
कॅमेरा लेन्स साफ करा.
QR कोड स्कॅनर वापरण्याआधी कॅमेरा लेन्स साफ आहे की नाही याची खात्री करुन घ्या. तो नसल्यास स्वच्छ पुसून घ्या.
आणखी वाचा – WhatsAppच्या मदतीने गॅस सिलेंडर बुक करायचा आहे? तर मग फॉलो ‘या’ सोप्या स्टेप्स
इंटरनेट कनेक्शन चेक करा.
व्हॉट्सअॅप वेब सुरु होत नसल्यास इंटरनेट कनेक्शन किंवा त्याचा एकूण स्पीड चेक करावा. QR कोड स्कॅन केल्यानंतर व्हॉट्सअॅपमधील डेटा डेस्कटॉपवरुन अॅक्सेस करण्यासाठी चांगल्या इंटरनेटची गरज असते.
ब्राउझरमधून cache क्लियर करा.
काहीवेळेस ब्राउझरमध्ये कॅशे फाइल्समुळे व्हॉट्सअॅप वेब वापरताना अडथळा निर्माण होऊ शकतो. या अनावश्यक गोष्टी काढल्याने तयार झालेला अडथळा नाहीसा होतो.
Dark mode सुरु करा.
वरील उपाय करुनही जर व्हॉट्सअॅप वेबवरील क्यूआर कोड स्कॅन होत नसेल, तर डेस्कटॉपमधील डार्क मोड ऑफ करा.
पूर्वी एक व्हॉट्सअॅप अकाउंट व्हॉट्सअॅप वेबद्वारे एकाच डेस्कटॉप डिव्हाइसला जोडणे शक्य होते. पुढे अपडेटनंतर, आता एक व्हॉट्सअॅप अकाउंट ४ डिव्हाइसेसना जोडता येते. असे केल्याने कधी कधी क्यूआर कोडमध्ये इरर येऊ शकतो.