International Literacy day : आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आहे. आपल्याकडे सर्वसाधारणपणे साक्षर लोक सही करतात आणि निरक्षर किंवा अक्षर ओळख नसलेली लोक अंगठा लावतात. त्यांना अंगठाछाप, अंगठेबहाद्दर म्हणतात. परंतु, सहीऐवजी अंगठ्याचे ठसे घेणे, किंवा पुरावा-ओळख पटवण्यासाठी अंगठ्याचे ठसे घेणे ही पद्धत कधी सुरु झाली, अंगठ्याचे ठसे घेण्याचे किती प्रकार आहेत, अंगठ्याच्या सहीचे असणारे ऐतिहासिक संदर्भ जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

अंगठा/बोटांचे ठसे म्हणजे काय ?

बोटांच्या तळहाताकडील भागाला शाई किंवा चिकट पदार्थ लावल्यास आणि ते बोट कागद , कापड आदींवर लावल्यास बोटांवरील रेषा-आकार जशाच्या तशा उमटतात, याला बोटांचे ठसे म्हणतात. या ठशांचा अभ्यास करणारेही शास्त्र असते त्याला ‘अंगुलीमुद्राशास्त्र’ अथवा बोटांच्या ठशांचे शास्त्र म्हणतात. या रेषांचे वैशिष्ट्य असे की, त्या आयुष्यभर त्या कायम असतात.

sebi worry about sme ipo
विश्लेषण: ‘एसएमई आयपीओं’तील तेजी खुपणारी का? त्यावर सेबीची चिंता आणि उपाययोजना काय?
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Driving a scooty in the wrong way
चुकीच्या पद्धतीने स्कुटी चालवल्याने उद्भवतील अनेक समस्या; ‘या’ टिप्स करतील मदत
Badlapur sexual assault case,
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण: आरोपीच्या चारित्र्याविषयी माहिती गोळा करण्याचे काम सुरू
Boiled Ajwain Water Benefits
रात्री झोपण्यापूर्वी ओव्याचे पाणी पिण्याचे अमृतासमान फायदे; पाहा शरीरात कोणते बदल होतात? 
health experts advise drummers for relief from permanent pain due to drumming
Pain From Drumming : ढोल-ताशावादनामुळे जडतेय कायमचे दुखणे! आरोग्यतज्ज्ञांचा वादकांना काळजी घेण्याचा सल्ला
order of CIDCO Deputy Registrar to submit Building Hazardous Certificate navi Mumbai
पुनर्विकासातील घोळांना चाप; इमारत धोकादायक प्रमाणपत्र सादर करण्याचे उपनिबंधकांचे आदेश
If we want to end rape from the root we have to finish male power
पुरुषसत्तेला ‘फाशी’ द्या…

हेही वाचा : स्वतंत्र भारताला ‘इंडिया’ म्हणण्यास जिनांनी केला होता विरोध! जाणून घ्या भारत आणि इंडियामधील फरक…


अंगठ्याचे ठसे का घेतले जातात ?

कोणत्याही दोन व्यक्तींच्या बोटांचे ठसे सारखे नसतात. १८९३ मध्ये इंग्लंडमध्ये गुन्हेगारांची ओळख पटविण्याच्या साधनांची चौकशी करण्याकरिता नेमलेल्या ‘ट्रुप कमिटी’ ने सांगितले की, दोन व्यक्तींच्या बोटांचे ठसे जुळण्याची शक्यता ६४ अब्जांमध्ये १ एवढी आहे’. ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या हातावरील रेषा समान नसतात. त्यामुळे व्यक्तीची स्वतंत्र ओळख होण्यासाठी अंगठा किंवा बोटांचे ठसे महत्त्वाचे असतात. तसेच पावलांचेही ठसे घेतले जातात.

हेही वाचा : Success Story : पत्रकार ते आयपीएस अधिकारी; जाणून घ्या ‘सिंघम लेडी’चा प्रवास…

अंगठाछापचा इतिहास

इतिहासपूर्व काळात बोटांच्या ठशांसारख्या आकृती, मुद्रा काही ठिकाणी सापडल्या आहेत. काही इष्टिकाग्रंथांतून म्हणजे विटेसारख्या वस्तूवर कोरलेल्या ग्रंथातून व प्राचीन कागदपत्रांतून बोटांचे ठसे आढळले आहेत. ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात चीनमध्ये कागदपत्रावर बोटांचे ठसे उमटविण्याची पद्धत रुढ होती. अनेक शतके चिनी बादशाहांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा राजमुद्रा म्हणून मानला जात होता. बोटांच्या ठशांचा पहिला शास्त्रीय अभ्यास इटलीतील बोलोन्या विद्यापीठातील शरीररचनाशास्त्राचे प्राध्यापक मार्चेल्लो मालपीगी यांनी १६८६ च्या सुमारास केला, असे उल्लेख आढळतात. टॉमस ब्युइक या कोरीवकाम करणाऱ्या कारागिरांनी इंग्लंडमध्ये १८०९ साली आपल्या बोटांच्या ठशासारखे आकृतिबंध लाकडावर कोरुन त्यांचा आपल्या ग्रंथावर छपाई करून व्यापारचिन्हासारखा उपयोग केला होता. ब्रेस्लौ विद्यापीठातील शरीररचनाशास्त्राचे प्राध्यापक जे. ई. पुर्‌किन्ये यांनी १८२३ मध्ये विद्यापीठाच्या पीएच.डी पदवीकरिता सादर केलेल्या प्रबंधात प्रत्येक बोटावरील रेषांचा निरनिराळा उल्लेख केला होता. परंतु या ठशांचा उपयोग व्यक्तीची ओळख पटविण्याकरिता करता येईल, असे संशोधन नव्हते झाले.
बोटांच्या ठशांचा ओळख पटविण्याकरिता उपयोग होऊ शकतो ही कल्पना टोकिओमधील रुग्णालयात काम करणाऱ्या हेन्री फॉल्डस या स्कॉटिश डॉक्टरांनी मांडली. १८८० मध्ये त्यासंदर्भात अनेक बोटांच्या ठशांचा अभ्यास करून ‘नेचर’ या शोध नियतकालिकामध्ये प्रसिद्ध केले. या त्यांच्या पत्रात बोटांवरील रेषांच्या आकृतिबंधातील व्यापक फरक, व्यक्तिनिष्ठता, शाश्वतता, त्यात बदल करण्याची अत्यल्प शक्यता किंवा घालवून टाकण्याची अशक्यता इत्यादींचा स्पष्ट उल्लेख होता. इंग्लंडला परतल्यावर फॉल्डस यांनी बोटांच्या ठशांचे न्यायकार्यातील महत्त्व तत्कालीन सरकारला व पोलीस खात्याला पटविण्याचा प्रयत्न केला होता.

यानंतर सर विल्यम जेम्स हर्शेल, सर फ्रान्सिस गॉल्टन आणि सर एडवर्ड हेन्री या तीन इंग्रज शास्त्रज्ञांनी या शास्त्रात मौलिक भर घातली.

सर विल्यम जेम्स हर्शेल यांना बंगालमधील हुगळी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना १८५८ मध्ये सरकारी कामकाजामध्ये नेहमीच्या सही घेण्याच्या पद्धतीबरोबरच कागदपत्रावर हाताचा पंजा उठविण्याची कल्पना सुचली. हर्शेल यांना सरकारी कामकाजात सही करून नाकबूल करणे आणि तोतयेगिरी यांना सतत तोंड द्यावे लागत असे. हात-बोटांच्या ठशाबद्दल जनतेत बराच भ्रममूलक विश्वास असल्याचे हर्शेल यांना माहीत होते. कामकाजात ठसे घेण्याची पद्धत त्यांनी जवळजवळ रुढ केल्यापासून तोतयेगिरी व नाकबुलीचे प्रमाण एकदम कमी झाले. त्यांनी त्या काळच्या बंगाल सरकारला ही पद्धत सबंध प्रांताच्या सरकारी कामकाजात वापरण्याची शिफारस केली पण प्रत्यक्षात ती प्रचारामध्ये आली नाही. भारतातील आपल्या कारकिर्दीत त्यांनी हातांचे व बोटांचे ठसे जमा करणे सुरुच ठेवले होते. या त्यांच्या पद्धतशीर संग्रहाचा पुढे गॉल्टन यांना बोटांच्या ठशांच्या उपयुक्ततेसंबंधी संशोधन करण्यात मोठा उपयोग झाला. बोटांचे ठसे जन्मापासून मरेपर्यंत कायम असतात व वाढत्या वयाबरोबर त्यांत कोणताही बदल होत नाही, हे हर्शेल यांनी स्वतःच्या बोटांच्या ठशांवरून सिद्ध केले होते. उजवी तर्जनी व उजवे मधले बोट यांचे ठसे त्यांनी १८५९, १८७७ आणि १९१६ मध्ये घेऊन ठेवले होते.
फॉल्डस व हर्शेल यांनी लक्ष वेधलेल्या बोटांच्या त्वचेवरील आकृतिबंधांच्या व्यक्तिनिष्ठतेबद्दल व कायमपणाबद्दल गॉल्टन यांनी अधिक अभ्यास केला. त्यांचा अभ्यास हा आनुवंशिकतेचा अभ्यास करणारा, तसेच मानवमिती म्हणजे मानवी शरीराचे मोजमाप करणारा होता.

सहीऐवजी अंगठ्याचा वापर कधी सुरू झाला ?

सर एडवर्ड रिचर्ड हेन्री हे भारतात बंगाल प्रांतात १८९१ मध्ये पोलिस महानिरीक्षक म्हणून काम करीत होते. गुन्हेगारांना ओळखण्याकरिता त्या वेळी ‘बर्टिलॉन पद्धत’ अथवा ‘मानवमिती पद्धत’ उपयोगात होती. हर्शेल यांचा बोटांच्या ठशांचा मर्यादित स्वरुपाचा उपयोग हेन्री यांना माहीत होता. बर्टिलॉन पद्धतीत काही फेरफार करून ती शास्त्रीय ज्ञान नसलेल्या व पूर्वशिक्षण नसलेल्यांनाही वापरता येईल, अशी नवी पद्धत हेन्री यांनी वापरात आणली. या पद्धतीत बोटांच्या ठशांचा सर्रास उपयोग केला होता. इंग्रज सरकारने १८९७ मध्ये ही पद्धत सरकारी पातळीवर वापरण्याचे ठरविले. याविषयी १९०० च्या सुमारास हेन्री यांनी लिहिलेला अहवाल ‘क्लासिफिकेशन अँड युझेस ऑफ फिंगरप्रिंट्स’ या पुस्तकरूपात आला.
आधुनिक अंगुलिमुद्राशास्त्र शास्त्रीय पायावर उभारण्याचे श्रेय हेन्री यांनाच द्यावे लागते. १९०१ च्या सुमारास हेन्री इंग्लंडला परतले व त्यांची पोलीस खात्यात उपआयुक्त म्हणून नेमणूक झाली. तेव्हापासून ब्रिटीश पोलीस त्यांची पद्धत वापरु लागले. स्कॉटलंड यार्डमध्ये बोटांच्या ठशांचा खास विभाग सुरु करण्यात आला. आजही अनेक देशांतून त्यांची पद्धत उपयोगात असून तिचा उल्लेख ‘हेन्री पद्धत’ असाच करतात. १८९९ मध्ये भारत सरकारने बोटांच्या ठशाबद्दलची तज्ञांची साक्ष ग्राह्य धरणारा कायदा केला. हेन्री भारतात असताना हेमचंद्र बोस आणि अझिझ-उल-हक् नावाच्या दोन हिंदी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या कामात मोठी मदत केली होती. त्याबद्दल सरकारने दोघांनाही मानसन्मान दिले होते.