देशात २०१६ मध्ये एकूण स्टार्टअप कंपन्यांची संख्या केवळ ४७१ होती. परंतु, ३० जून, २०२२ पर्यंत मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या ७२,९९३ पर्यंत वाढली होती. भारतासारख्या देशात स्टार्टअपच्या बाबतीत नवी क्रांती झाली आहे, हे या आकडेवारीवरून सहज समजू शकते. जेव्हा एखादे स्टार्टअप सतत वाढत राहते. तेव्हा कंपनीचे मूल्यांकनही वाढते. कंपनीच्या मूल्यांकनासोबतच याला युनिकॉर्न, डेकाकॉर्न आणि हेक्टोकॉर्नचा दर्जा दिला जातो. एखाद्या स्टार्टअपला हा दर्जा कधी मिळतो, ते जाणून घेऊ…
युनिकॉर्न म्हणजे काय ?
युनिकॉर्न हा भांडवल उद्योगात वापरला जाणारा एक लोकप्रिय शब्द आहे. एक अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षाही अधिक बाजारमूल्य असलेल्या खासगी स्टार्टअप कंपनीला ‘युनिकॉर्न कंपनी’ म्हटले जाते. व्हेंचर कॅपिटल इंडस्ट्रीमध्ये ज्या खासगी मालकीच्या कंपनीचे बाजारमूल्य १ अब्ज डॉलर म्हणजेच ८२०० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक आहे अशा कंपनीला युनिकॉर्न स्टार्टअप म्हटले जाते.
हेही वाचा : शेअर बाजारामधील ‘बायबॅक’ तुम्हाला माहीत आहे का? कंपन्या का करतात ‘बायबॅक’? जाणून घ्या…
युनिकॉर्न शब्दाचा उगम
हा शब्द प्रथम काउबॉयच्या संस्थापक आयलीन ली यांनी २०१३ मध्ये वापरला होता. जेव्हा युनिकॉर्न म्हणून १ बिलियन डॉलरपेक्षा जास्त मूल्य असलेल्या ३९ स्टार्टअप्सचा उल्लेख केला होता. हा शब्द सुरुवातीला अशा स्टार्टअप्सच्या दुर्मिळतेवर जोर देण्यासाठी वापरला जात असे. तेव्हापासून युनिकॉर्न स्टार्टअपची व्याख्या कधी बदलली नाही. मात्र,युनिकॉर्नची संख्या वाढली आहे.
हेही वाचा : शेअर बाजारात वापरण्यात येणारी ‘इक्विटी’ संकल्पना काय आहे ?
स्टार्टअप युनिकॉर्न कधी बनतो?
जेव्हा एखादी कंपनी एका छोट्या मूल्यांकनने सुरू केली जाते आणि तिच्या व्यवहारात नंतर वाढ होते. मग अशी वेळ येते जेव्हा कंपनीचे मूल्यांकन, प्रगती करत असताना, १ बिलियन डॉलर्स म्हणजेच १ अब्ज डॉलर्स किंवा त्याहून अधिक होते. अशा परिस्थितीत त्या स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा दिला जातो.
युनिकॉर्नचे प्रकार
डेकाकॉर्नचा दर्जा :
युनिकॉर्न नंतर, कंपनी डेकाकॉर्न बनण्याचा प्रवास सुरू करते. जेव्हा ती कंपनी नफा कमावताना १० अब्ज डॉलरचे मूल्यांकन प्राप्त करते. तेव्हा त्या कंपनीला डेकाकॉर्नचा दर्जा दिला जातो. पेटीएम आणि बायजू यांना भारतात डेकाकॉर्नचा दर्जा आहे.
हेक्टोकॉर्न दर्जा :
जेव्हा एखादी कंपनी १० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडते आणि १०० अब्ज डॉलरचे मूल्यांकन साध्य करते, तेव्हा ती कंपनी हेक्टोकॉर्न बनते. चीनची या सर्वांशिवाय, सूनिकॉर्न नावाचा आणखी एक दर्जा आहे. या दर्जामध्ये अशा कंपन्यांना ठेवण्यात येते की, ज्यांची लवकरच युनिकॉर्न बनण्याची क्षमता आहे आणि त्यांचे मूल्यांकन १ अब्ज डॉलर्सच्या पुढे जाण्याच्या मार्गावर आहे.