सध्या महाराष्ट्रासह देशात थंडी वाढली आहे. सगळीकडे थंडीने कहर केला आहे. राजधानी दिल्लीतसुद्धा पारा कमी झाला आहे. भारतीय हवामान विभाग वेळोवेळी हवामानासंदर्भात माहिती देत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, हवामान विभाग थंडीची लाट आली आहे हे कसे ओळखतात? आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कोल्ड डे’ म्हणजे काय?

तुम्ही ‘कोल्ड डे’ हा शब्द ऐकला किंवा वाचला आहे का? ‘कोल्ड डे’ म्हणजे ‘थंड दिवस’ होय. ज्या दिवशी तापमान खूप कमी असते, तो दिवस ‘कोल्ड डे’ मानला जातो. पण, तापमान कमी आहे हे कसे ठरवतात? तर जाणून घ्या.
ज्या दिवशी कमाल तापमान ४.५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी असते आणि किमान तापमान १० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी असते, त्या दिवसाला ‘कोल्ड डे’ म्हणजेच ‘थंड दिवस’ मानला जातो.

हेही वाचा : टीम इंडियाच्या जर्सीवर असणारे हे तीन स्टार नेमके कसले? जाणून घ्या या तीन स्टारचे महत्त्व 

थंडीची लाट ही दोन प्रकारची असते. एक म्हणजे साधारण थंडीची लाट आणि दुसरी म्हणजे तीव्र स्वरूपाची थंडीची लाट.

तीव्र स्वरूपाची थंडीची लाट कशी ओळखतात?

हवामान विभाग तीव्र थंडीची लाट आलेली आहे हे तेव्हा जाहीर करतात, जेव्हा किमान तापमान २ अंश सेल्सियसपेक्षा कमी होते किंवा ६.५ किंवा सामान्य तापमानापेक्षा कमी होते. या लाटेचा प्राण्यांवरही परिणाम होतो. धुक्यांमुळे दृश्यतेवर परिणाम दिसून येतो आणि हवेची गुणवत्तासुद्धा खालावते, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

साधारण थंडीची लाट कशी ओळखतात?

जेव्हा किमान तापमान १० अंश सेल्सियसच्या खाली येते आणि कमाल तापमान आणि सामान्य तापमानामध्ये ६.५ अंश सेल्सियसचा फरक असतो किंवा त्याहून अधिक असतो, तेव्हा साधारण थंडीची लाट आली असे मानले जाते.

जेव्हा थंडीची लाट येते तेव्हा स्थानिक लोकं कडाक्याच्या थंडीत शेकोटी पेटवून ऊब घेण्याचा प्रयत्न करतात. गेल्या काही दिवसांमध्ये, हवामान विभागाच्या अंदाजानुसार राजधानी दिल्ली आणि शहराच्या अवतीभोवती दाट धुके पसरले आहे. धुक्यामुळे दृश्यतेवरसुद्धा परिणाम दिसून येत आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When is severe cold wave and cold day declared by imd know its criteria and more about it ndj