History of Marriage : विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. लग्नाद्वारे दोन व्यक्ती आणि दोन कुटुंबे एकत्र येऊन, नव्या आयुष्याची सुरुवात करतात. लग्न म्हणजेच विवाहामुळे समाजात कुटुंबप्रणाली अस्तित्वात आहे. विवाहसंस्थेने माणसाच्या सर्व गरजा पूर्ण केल्या. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, विवाह ही संकल्पना कधी अस्तित्वात आली? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Marriage (विवाह) शब्द कुठून आला?

विवाह या शब्दाला इंग्रजीत ‘Marriage’ असे म्हणतात. हा शब्द मिडल इंग्रजीतून आला; ????जो पहिल्यांदा १२५० ते १३०० मध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या ११ व्या आवृत्तीत दिसला. (या शब्दकोशाचा पहिला खंडच १ फेब्रुवारी १८८४ रोजी प्रसिद्ध झाला. मग हा कालावधी? संदर्भ चुकीचा आहे वा बरोबर याबाबतची शंका येण्याची सवय स्वत:ला लावून घे)??? त्यामुळे विवाहसंस्था ही कदाचित त्या काळापूर्वीची असावी. विवाहाचे मुख्य उद्दिष्ट हे कुटुंबांमध्ये एकता निर्माण करणे हे होय. पालक मुलांच्या विवाहाची जबाबदारी घेतात; ज्याचा फायदा पुढे वर-वधू अशा दोन्ही बाजूंना होतो.

हेही वाचा : रेल्वेमधले डायनॅमिक तिकीट दर म्हणजे काय? प्रवाशांच्या मागणीनुसार वाढत जातात तिकिटांच्या किंमती…

विवाह म्हणजे काय?

लेखिका मंगला सामंत यांनी ‘लोकसत्ता’मध्ये लिहिलेल्या ‘आपुले लग्न पाहिले म्या डोळा!’ या लेखात सांगतात, “गेली सुमारे तीन ते चार हजार वर्षं विवाह ही स्त्री-पुरुषांच्या सहजीवनाची रुळलेली समाजमान्य पद्धत आहे, हे आपण जाणतोच. मी पुण्यातील कर्वेनगरमध्ये असलेल्या हिंगणे संस्थेच्या कॉलेजमध्ये घेण्यात येणाऱ्या ‘विवाह-समुपदेशक कोर्स’मध्ये स्त्री-पुरुषांसाठीचे एक व्याख्यान द्यायला दरवर्षी जात असते. तिथे प्रत्येक बॅचला ‘विवाह म्हणजे काय?’ हा माझा पहिला प्रश्न असायचा. त्यावर ‘विवाह ही शरीरसंबंधाची एक पद्धत आहे’, हे उत्तर सोडून सर्व प्रकारची उत्तरे मिळत होती. शरीरसंबंधाखेरीज कोणत्या वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून विवाहाकडे पाहिले जाते त्याचा मला मिळालेला तो अनुभव होता. जोडीदाराची निवड करताना कुणाला कशा पद्धतीने निवड करावीशी वाटेल, तो प्रत्येकाचा स्वत:चा निर्णय असतो.”

भारतात लग्न नावाची परंपरा नेमकी कधी अस्तित्वात आली?

‘द वीक’ (The week)नुसार, विवाहसंस्था ४,३५० वर्षांहून जुनी आहे. पहिला नमूद केलेला विवाह मेसोपोटेमियामध्ये इसवी सनपूर्व २३५० मध्ये झाला होता.

स्त्री ही संपूर्ण कुळाची मालमत्ता असते. तिचा उपभोग कुळातील कुणीही, प्रत्यक्ष तिच्या पुत्रांनीही घेणे येथपासून बहुपतीत्व वा बहुपत्नीत्व ते एकपत्नीत्व वा एकपतीत्व अशा प्रकारे विवाहसंस्था कालानुरूप बदलत गेली.
अतिप्राचीन आणि प्राचीन काळात विवाहाकडे वेगळ्या नजरेने बघितले जात असे. शारीरिक संबंध, वंशवाढ व मानसिक गरज म्हणून विवाह केला जात असे.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी ‘भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहास’ या त्यांच्या पुस्तकातून भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास सांगितला आहे. आई, मुलगी, बहीण यांच्याशी व्यवाय करणारे (शारीरिक संबंध ठेवणारे) असे लोक कौरव-पांडवांच्या काळी भारतवर्षात होते, हे त्यांनी या पुस्तकातून सिद्ध करून दाखवले. तेव्हाची विवाह ही संकल्पना आताच्या विवाह संकल्पनेपेक्षा खूप वेगळी होती, हे तुम्हाला दिसून येईल.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या ग्रंथातून राजवाडे सांगतात की, अतिप्राचीन आणि प्राचीन समाजात स्त्री-पुरुष समागमासंबंधी अशा अनेक चालीरीती होत्या; ज्यावर आपला विश्वास बसणार नाही.

हेही वाचा : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Assembly Seats: महाराष्ट्रात विधानसभेच्या किती जागा आहेत? जिल्ह्यानुसार सर्व जागांची यादी एका क्लिकवर वाचा

पुस्तकात दिलेली काही उदाहरणे आपण पाहू या –

“ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळातील यम आणि यमी या बहीण-भावातील संवादाचे सूक्त सर्वप्रसिद्ध आहे. त्यात यमी आपल्या सख्ख्या भावाला, तू माझ्याशी पतीभावाने वाग आणि आपल्या बापाचा नातू माझ्या ठायी उत्पन्न कर, असे म्हणते.”

“महाभारताच्या उद्योगपर्वाच्या १०६ ते १२३ या अध्यायांत माधवीचे आख्यान आहे. गालव नावाच्या ऋषीला गुरुदक्षिणा देता यावी यासाठी ययाती या राजाने आपली मुलगी माधवी दिली. ऋषीने तिला स्वत:ची मुलगी म्हणून तीन राजांना एकेक पुत्र होईपर्यंत क्रमाक्रमाने भाड्याने दिली आणि नंतर ती मुलगी गालवाने आपला गुरू विश्वामित्र याला पत्नी म्हणून अर्पण केली. तिच्यापासून विश्वामित्राला एक पुत्र झाला. त्यानंतर त्याने तिला तिचे वडील राजा ययाती याच्या परत स्वाधीन केली.”

“द्रौपदी ही पाच भावांची पत्नी होती”

“कृष्णाला १६,००० गोपी स्त्रिया होत्या.”

आता विवाहसंस्थेचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. हल्ली स्त्री-पुरुष समानतेमुळे संपूर्ण विवाहसंस्थेवर परिणाम झाल्याचे दिसून येते. बहुपतीत्व वा बहुपत्नीत्वापासून एकपत्नीत्व वा एकपतीत्वपर्यंत झालेला बदल नातेसंबंधामध्ये प्रामाणिकपणा निर्माण करतो; ज्यामुळे विवाहसंस्था अधिक मजबूत होताना दिसत आहे.

(संदर्भ – ‘दी वीक’, ‘आपुले लग्न पाहिले म्या डोळा!’ (मंगला सावंत यांचा लेख – लोकसत्ता), विवाहसंस्थेचा (बदलता) इतिहास (लोकसत्तामधील लेख), भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास : इतिहासाचार्य वि. का. राजवाडे)

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When the institution of marriage existed for what is marriage know history of marriage ndj