Flight Cargo Capacity : विमान प्रवास करताना बऱ्याचदा प्रवासापेक्षा जास्त वेळ विमानतळावर तुमचे लगेज मिळवण्यात गेल्याचे प्रकार घडल्याचे आपण ऐकतो. अशावेळी बऱ्याचदा प्रश्न पडतो की नेमकं विमानात लगेज ठेवलं तरी कसं जातं? विमानात प्रवाशांचं लगेज हे ठरवून दिलेल्या कार्गो होल्ड आणि ओव्हरहेड कंपार्टमेंट्समध्ये ठेवले जाते, जे कंपार्टमेंट प्रवासी बसत्ता द्या कॅबीनमध्येच असतात. आज आपण हेच जाणून घेणार आहोत की विमानात सामान कसं ठेवलं जातं आणि त्याच्या क्षमता किती असते आणि त्याबद्दल नेमके काय नियम आहेत?

चेक केलेलं सामान कुठे ठेवतात?

तपासणी केलेले सामान हे कार्गो होल्ड मध्ये ठेवतात जे पॅसेंजर केबिनच्या खाली असते. कार्गो होल्ड हा विमानाचे इंजिन, पंख, शेपूट सोडून शिल्लक राहिलेला मुख्य भाग असतो, या जागी ठेवण्यात आलेलं सामान सुरक्षित राहावं यासाठी ही जागा प्रेशराइज्ड आणि तापमान नियंत्रित केलेली असते. मोठ्या विमानात अशी अनेक कार्गो कंपार्टमेंट्स असू शकतात. विमान जमिनीवर असताना त्याची देखभाल करण्याचे काम करणारे विमानतळावरील कर्मचारी खास यंत्रांच्या मदतीतीने कार्गो दरवाज्यांमधून सामान विमानात चढवतात.

Image Of passengers
Mumbai-Prayagraj Flight Fare : महाकुंभमुळे विमान प्रवास १६२ टक्क्यांनी महागला, जाणून घ्या मुंबई-प्रयागराज विमानाचे तिकीट दर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sudhir Mehta expressed his opinion regarding Pune Airport Pune news
‘पुणे विमानतळाचा व्यावसायिकदृष्ट्या विस्तार महत्त्वाचा’,कोणी केली मागणी ?
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण
Gold, charas, ganja, Mumbai airport,
मुंबई विमानतळावर सोने, चरस, गांजा जप्त
Nagpur airport loksatta news
नागपूर विमानतळ विस्तार, प्रशासन मिशन मोडवर
Chief Minister Devendra Fadnavis orders to complete airport works at the earliest Mumbai news
विमानतळांची कामे वेगाने पूर्ण करा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

विमानाची सामान वाहून नेण्याची क्षमता किती असते?

विमानात किती सामान बसतं? याचा विचार केला तर विमान कोणत्या प्रकाराचे आहे यावरून त्याची सामान वाहून नेण्याची क्षमता ठरते. बोइंग ७३७ या विमानात अंदाजे ३,४०० ते ४००० किलोग्रॅम सामान बसते, तर एअरबस ए३२० प्रकारच्या विमानात ४,५०० पर्यंत सामान बसू शकते. तर काही विमानांची क्षमता ही २०,००० किलोग्रॅमपर्यंत आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान साधारणपणे २० ते ३० किलोग सामान घेऊन जाण्याची परवानगी असते.

केबिन बॅगेज किंवा कॅरी ऑन

विमानातील पॅसेंजर कंपार्टमेंटमध्ये प्रवासी घेऊन जाऊ शकतात त्या सामानाला कॅबिन बॅगेज म्हणतात. हे सामान बऱ्याचदा वरच्या बाजूला बनवलेल्या कंपार्टमेंटमध्ये किंवा सीटच्या खाली हे सामान ठेवता येते. प्रवासी हातात घेऊन गेलेले सामाना सीटच्या वर असलेल्या कंपार्टमेंटमध्ये ठेवू शकतात. तर छोट्या वस्तू सीटच्या खाली ठेवता येतात. पॅसेंजर कंपार्टमेंटमध्ये असे सामान ठेवण्यासाठीची जागा देखील प्रत्येक विमानाच्या प्रकारानुसार वेगळी असते.

विमानात ठराविक वजनाचंच सामान का लागतं?

विमानच्या बॅलेन्ससाठी वजन योग्य रित्या विभागलेले असणे खूप गरजेचे असते. त्यामुळे विमानात सामान खूप विचारपूर्वक लोड केले जाते जेणेकरून सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी राखली जाईल. काही विशिष्ट प्रकारचे सामान विमानात घेऊन जाता येत नाही, जसेच की लिथीयम बॅटरीज किंवा इतर ज्वलनशील पदार्थ. तर काही विमानांमध्ये प्रवाशांच्या सामानाबरोबरच इतर साहित्य वाहून नेण्यासाठी वेगळी जागा असते.

सुरक्षितता आणि कार्यक्षमता राखण्यासाठी विमानात सामान ठेवण्यासाठी त्याचे वजन आणि आकारानुसार ठरवून दिलेल्या जागा असतात.चेक केलेले सामान प्रेशराइज्ड कार्गो होल्डमध्ये ठेवले जाते, तर कॅरी-ऑन बॅग प्रवाशांसोबत केबिनमध्ये ठेवल्या जातात. सुरळीत प्रवासासाठी एअरलाइन्सनी हे नियमांचे काटेकोरपणे पालन करणे महत्त्वाचे असते. .

Story img Loader