पापुआ न्यू गिनी या देशाला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच भेट दिली. या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं थाटामाटात स्वागतही झालं. या देशाचे पंतप्रधान जेम्स मारापे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडले. सोशल मीडियावर हा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला. याबाबत संजय राऊत यांनी कडाडून टीकाही केली. ‘कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ या सन्मानाने याच देशात मोदींना गौरवण्यात आलं. मात्र हा देश कुठे आहे? या देशाचं वैशिष्ट्य काय? याबाबतच्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत.

कुठे आहे पापुआ न्यू गिनी हा देश? लोकसंख्या किती?

उत्तर: पापुआ न्यू गिनी हा देश इंडोनेशिया जवळ प्रशांत महासागरच्या क्षेत्रात आहे. दक्षिण प्रशांत महासागर क्षेत्रातला हा द्वीपसमूह आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार या देशाची लोकसंख्या साधारण ९८ लाखांच्या घरात आहे.

Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
Thane dog, floor thrown dog feet, damage bike,
ठाणे : दुचाकीचे नुकसान झाल्याने श्वानाच्या पायावर फरशी टाकली
Adinath Kothare Manjiri Oak
“डोळ्यातून पाणी आलं…”, आदिनाथ कोठारेचे ‘पाणी’ चित्रपटासाठी कौतुक करत मंजिरी ओक म्हणाल्या, “ही तुझी पहिली फिल्म …”
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
Image of BJP MLA T Raja Singh.
T Raja Singh : भाजपा आमदाराने भर कार्यक्रमात फाडला बांगलादेशचा ध्वज, गोव्यात नेमकं काय घडलं?
Indian Foreign Secretary Vikram Misri visits Bangladesh
परराष्ट्र सचिव मिस्राी आज ढाक्यात; बांगलादेशला दोन्ही देशांतील तणाव निवळण्याची आशा

पापुआ न्यू गिनी देशात कुठला धर्म मानला जातो?

उत्तर: पापुआ न्यू गिनी या देशात ख्रिश्चन हा प्रमुख धर्म आहे. देशाच्या लोकसंख्येतले ९५ टक्के नागरिक हे ख्रिश्चन आहेत.

पापुआ न्यू गिनी देशाची राजधानी काय आहे?

उत्तर:पोर्ट मोरेस्बी ही या देशाची राजधानी आहे.

पापुआ न्यू गिनी या देशात किती भाषा बोलल्या जातात?

उत्तर: पापुआ न्यू गिनी या देशात ८५० भाषा बोलल्या जातात.

या देशाची अर्थव्यवस्था कशी आहे?

पापुआ न्यू गिनी हे जगातील तिसरे मोठे बेट आहे. कमी मध्यम उत्पन्न असणाऱ्या या देशाचा बराचसा भाग ग्रामीण लोकसंख्येचा आहे. भाषेच्या बाबतीत जगातील सर्वात वैविध्यपूर्ण म्हणून पापुआ न्यू गिनीकडे पाहिले जाते. इथे ८५० भाषा बोलणारे लोक राहतात. वर्ल्ड फॅक्टबुकच्या माहितीनुसार या बेटावरील लोकसंख्या ९८ लाख १९ हजार ३५० एवढी आहे. पापुआ न्यू गिनीमध्ये अनेक स्थानिक जमाती आहेत. शेती हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. बाहेरील जगाशी त्यांचा क्वचितच संबंध येतो.

पापुआ न्यू गिनी हे नाव कसं पडलं?

१६ सप्टेंबर १९७५ रोजी पापुआ न्यू गिनी एक स्वतंत्र देश अस्तित्त्वात येईपर्यंत १८८० पासून इथे जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनने राज्य केले होते. वर्ल्ड फॅक्टबुकच्या माहितीनुसार पापुआ हा शब्द मलय (मलेशियाची भाषा) भाषेतील पापुहा (papuah) या शब्दापासून तयार झाला. पापुहा म्हणजे मलेनेशियन नागरिकांचे कुरळे केस. स्पॅनिश एक्सप्लोरर वायनिगो ओर्टिझ याला आफ्रिकेतील गिनी बेटावरील साधर्म्य याठिकाणी आढळून आल्यानंतर त्याने या बेटाला न्यू गिनी असे नाव १५४५ साली दिले होते. त्यामुळे या बेटाचे नाव पापुआ न्यू गिनी असे पडलेले आहे.

घरगुती हिंसाचाराच्या घटनांसाठी ओळखला जातो हा देश

बीबीसीने दिलेल्या एका वृत्तानुसार पापुआ न्यू गिनी हा देश घरगुती हिंसाचारासाठी ओळखला जातो. २०१८ या एका वर्षात या देशात घरगुती हिंसाचार आणि बलात्काराचे ६ हजार गुन्हे नोंदवले गेले. या देशातल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे की ही ६ हजार ती प्रकरणं आहेत ज्याची नोंद झाली आहे. मात्र गुन्हा नोंदवला गेला नाही अशी किती प्रकरणं आहेत? ते माहित नाही. जर तुम्ही या देशात कुणालाही विचारलं तर तो व्यक्ती सांगेल की महिलांसह हिंसाचाराच्या घटना घडणं हे अनेक घरांमध्ये घडतं. एखादी महिला जी कुणाची पत्नी आहे, गर्लफ्रेंड किंवा मैत्रीण आहे तिच्यासह हिंसाचार घडणं, तिला मारहाण होणं हे या देशात अगदी सामान्य घटनेसारखं आहे. साधारण आठ वर्षांपूर्वी पापुआ न्यू गिनी देशात फॅमिली प्रोटेक्शन अॅक्ट तयार केला गेला आहे. ज्यानुसार घरगुती हिंसाचार हा एक गुन्हा आहे आणि त्यासाठी दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते किंवा दोन हजार अमेरिकी डॉलर्सचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

महिलांसाठी सर्वात असुरक्षित देश

महिलांसाठी हा देश अत्यंत असुरक्षित मानला जातो. देशातल्या महिलांपैकी साधारण ७० टक्के महिला या बलात्कार, सामूहिक बलात्कार किंवा लैंगिक शोषणाच्या शिकार झालेल्या असतात. या देशात पितृसत्ताक पद्धती लागू आहे. त्यामुळे या प्रकारचे अनेक गुन्हे इथे घडतात.

पापुआ न्यू गिनी महत्त्वाचा देश का?

भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर पापुआ न्यू गिनी हा देश जपानपेक्षाही आकाराने मोठा आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी या ठिकाणीही अनेक लढाया झाल्या. चीनने या देशात काही अरब डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. या देशात तांबे, सोने यांच्या खाणींचं भांडार आहे. तसंच विविध प्रकारची खनिजंही या देशात सापडतात. त्यामुळेच या देशावर चीनची दीर्घकाळापासून नजर आहे. पापुआ न्यू गिनी हा देश १९७५ पर्यंत ऑस्ट्रेलियाच्या अखत्यारीत होता. मात्र १९७५ ला हा देश स्वतंत्र झाला. चीन या देशावर प्रभाव पाडत असतानाच अमेरिकेने या देशाशी एक सुरक्षा करार केला आहे. या करारामुळे आमची अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे असं पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी म्हटलं आहे.

पापुआ न्यू गिनी देशात १८ जिवंत ज्वालामुखी

पापुआ न्यू गिनी देशात १८ जिवंत ज्वालामुखी आहेत. त्यामुळे या देशात भूकंप येत असतात. १८८० च्या दशकात या देशात सोन्याच्या खाणी असल्याचा शोध लागला. सोन्याच्या उत्पादनात हा देश जगात ११ व्या क्रमांकावर आहे.

Story img Loader