7 Countries Offering Golden Visas to Indians : गोल्डन व्हिसा हा व्हिसाचा असा प्रकारआहे, जो ठरावीक गुंतवणुकीच्या आधारावर दिला जातो. एखाद्या देशाचे नागरिकत्व मिळवण्यासाठी संबंधित व्यक्तीला त्या देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करावी लागते. ज्यामध्ये प्रॉपर्टी विकत घेणे असो किंवा व्यवसाय सुरू करणे किंवा इतर आर्थिक गुंतवणूक करणे होय.
काही देश गुंतवणूकदाराला सुरुवातीला गोल्डन व्हिसा देतात आणि तात्पुरत्या स्वरूपात देशाचे नागरिकत्व देतात. त्यानंतर काही वर्षांनी त्या गुंतवणूकदारांना कायमस्वरूपी त्या देशाचं नागरिकत्व देण्यात येतं. जी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, त्यांनाच हा व्हिसा दिला जातो. पण, तुम्हाला माहितीये का कोणते देश भारतीयांना व्हिसा देतात? आज आपण अशा सात देशांविषयी जाणून घेणार आहोत.
पोर्तुगाल
चांगल्या फंड्समध्ये गुंतवणूक केल्यास, तसेच वैज्ञानिक संशोधन किंवा व्यवसाय विस्तारामध्ये गुंतवणूक केल्यास पोर्तुगाल भारतीयांना व्हिसा देऊ शकतो.
ग्रीस
ग्रीसमध्ये ५,००,००० डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणुकीची आवश्यकता असते; पण भारतीय व्यक्ती लोकल स्टार्टअप्समध्ये ३,१०,००० डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करीत असेल, तर तिला गोल्डन व्हिसा मिळू शकतो.
स्पेन
स्पेनने ‘गोल्डन व्हिसा’ रद्द करण्याची घोषणा केली आहे; पण ज्यांनी २०२४ पूर्वी अर्ज केले असतील, त्या गुंतवणूकदारांना अजूनही फायदा मिळू शकतो.
कॅरिबियन नेशन्स
जी व्यक्ती २,००,००० डॉलर्सपासून सुरू होणारी आर्थिक गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविते, त्या व्यक्तीला सेंट किटिझम नेव्हिस, ग्रेनाडा, अँटिग्वा या देशांकडून पारपत्र देण्यात येते.
संयुक्त अरब अमिराती (UAE)
संयुक्त अरब अमिराती आरोग्य सेवा आणि तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या भारतीयांना गोल्डन व्हिसा मिळवण्याची चांगली संधी देतात.
माल्टा
माल्टाच्या गोल्डन व्हिसाची किंमत तब्बल ५४ कोटी रुपये आहे. हा गोल्डन व्हिसा मिळविण्यासाठी खूप कठोर पद्धतीने तपासणी केली जाते. माल्टाकडून गुंतवणुकीद्वारे नागरिकत्व दिले जाते.
सिंगापूर
ग्लोबल इन्व्हेस्टर प्रोग्राम लोकल व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुक करणाऱ्यांना सिंगापूरमध्ये कायमस्वरूपी गोल्डन व्हिसा देण्यात येतो.
“गोल्डन व्हिसा मिळवणं हे अस्थिर जगातील आर्थिक आणि राजकीय जोखमींविरुद्ध सर्वोत्तम विमा धोरण आहे,” असे हेनली अँड पार्टनर्सने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले आहे. काही वर्षांपूर्वी युरोपवर मोठं आर्थिक संकट ओढवलं होतं, ज्याला तोंड देण्यासाठी युरोपिन देशांनी परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या. यादरम्यान गोल्डन व्हिसाला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती.