Which Animals Can Survive Without Oxygen : माणूस असो वा प्राणी जगायचं असेल, तर ऑक्सिजनची गरज ही लागतेच. जगण्यासाठी श्वास घेणे खूप आवश्यक आहे; पण ऑक्सिजनची उपलब्धता नसलेल्या ठिकाणी राहणाऱ्या काही प्राण्यांना ऑक्सिजनशिवाय जगण्याशिवाय पर्याय नाही. ही अनोखी उत्क्रांती त्यांना प्राण्यांच्या साम्राज्यातील काही सर्वांत विलक्षण प्राणी बनवते. चिखलाच्या दलदलीत, खोल समुद्रात किंवा इतर प्राण्यांच्या शरीरात आढळणारे हे प्राणी जगातील सर्वांत कठोर वातावरणात टिकून राहतात(Animals That Live Without Oxygen). तर हे प्राणी कोणते याबद्दल जाणून घेऊ…
हायड्रा (Hydra)
जेलीफिश आणि समुद्री ॲनिमोन्सचा जवळचा नातेवाईक असलेला हायड्रा हा एक लहान आणि गोड्या पाण्यात राहणारा प्राणी आहे. हा प्राणी समुद्राच्या तळाशी राहतो. हायड्रा सामान्यत: श्वासोच्छवासासाठी ऑक्सिजन वापरतो; पण कमी ऑक्सिजन असलेल्या वातावरणात ॲनारोबिक (anaerobic) श्वासोच्छ्वासावर ‘स्विच’ करण्याची क्षमता त्याचाकडे आहे (Animals That Live Without Oxygen).
काटेरी डोक्याचे वर्म्स (Spiny headed worms)
हे वर्म्स निसर्गात परजीवी असतात आणि होस्टसच्या आतड्यांमध्ये (hosts’ intestines) राहतात. हे वर्म्स मासे, सस्तन प्राणी व पक्ष्यांमध्ये आढळतात. आतड्यांमध्ये ऑक्सिजन नसल्यामुळे (Animals That Live Without Oxygen) हे प्राणी वर्म्सच्या शरीरातून पोषक द्रव्ये थेट शोषून घेतात. ही बाब त्यांना टिकवून ठेवण्यास सक्षम करते.
हेही वाचा…आता WhatsApp Pay द्वारे थेट करा UPI पेमेंट; पैशांची देवाण-घेवाण होईल सोपी; कसे ते घ्या जाणून…
लोरीसिफेरा (Loricifera)
लोरीसिफेरा हा एक सूक्ष्म प्राणी आहे; जो सर्वांत खोल, महासागरांच्या (डार्क ओशन) समुद्रतळांवर राहतो. त्यांना ऑक्सिजनऐवजी श्वासोच्छवासासाठी हायड्रोजन वापरण्याचा मार्ग सापडला आहे. खोल समुद्राच्या तळांच्या चिखलात राहणारा हा प्राणी अत्यंत प्रतिकूल वातावरणात जीवन जगण्याची क्षमता असल्याचे सिद्ध करतो.
टार्डिग्रेड्स (Tardigrades)
टार्डिग्रेड्स हे सूक्ष्म प्राणी आहेत, जे कठोर वातावरणात टिकून राहण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात. हे प्राणी वॉटर बियर्स म्हणूनही ओळखले जातात. तसेच हे प्राणी श्वासोच्छ्वासासाठी ऑक्सिजन वापरतात. पण, त्यांच्याकडे एक्स्ट्रीम वातावरणात सर्व शारीरिक कार्ये थांबविण्याची शक्तीसुद्धा आहे. शरीराला विराम (pause) देण्याची ही क्षमता या प्राण्यांना पाण्याखाली जगण्यास मदत करते.