भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे प्रत्येक शहराची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. यामध्ये काही शहरे त्यांच्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत तर काही त्यांच्या सांस्कृतिक वारशासाठी जगात प्रसिद्ध आहेत. तुम्ही कोणत्याही शहरात गेलात तर तुम्हाला कळेल की त्याचा इतिहास प्राचीन काळाशी जोडलेला आहे. जर तुम्ही भारताचा इतिहास वाचलात तर तुम्हाला हे देखील कळेल की भारतात दारु फार पूर्वीपासून बनते. भारतात एक शहर आहे, ज्याला भारताचं वाईन कॅपिटल देखील म्हणतात.
भारताचं वाईन कॅपिटल अशी ओळख कोणत्या शहराला मिळाली आहे ?
तुम्हाला या शहराबद्दल माहिती आहे का? भारताचं वाईन कॅपिटल अशी ओळख कोणत्या शहराला मिळाली आहे, याचं उत्तर जाणून घेऊयात. आपल्याकडे मद्यप्रेमींची कमी नाही. अशातच महाराष्ट्रातील एका शहराला भारताचं वाईन कॅपिटल अशी ओळख मिळाली आहे. महाराष्ट्र राज्यात असलेल्या नाशिक शहराला भारताची वाईन कॅपिटल म्हणजेच भारताची वाईन राजधानी म्हटले जाते. लोक हे शहर नाशिक म्हणून कमी आणि भारताची वाईन कॅपिटल म्हणून जास्त ओळखतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतात उत्पादित होणाऱ्या मद्याचा मोठा हिस्सा याच शहरात तयार होतो. या एकट्या शहरात ५२ वाईन प्लॉट्स असून ते चालवण्यासाठी ८००० एकरमध्ये द्राक्षांची लागवड केली जाते.
हेही वाचा >> World First Mobile: जगातील पहिला मोबाइल फोन कुणी बनवला? पाहा त्यावेळी किती होती किंमत
जर आपण आजूबाजूच्या परिसरात असलेल्या सर्व प्रकारच्या द्राक्षांच्या बागा पाहिल्या तर त्याचे एकूण क्षेत्र सुमारे १८००० एकर आहे. त्याठिकाणी द्राक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्याने वाइन तयार करण्यासाठी तेथे असलेल्या कंपन्यांना ते सहज उपलब्ध होते.
हेही वाचा >> World First Mobile: जगातील पहिला मोबाइल फोन कुणी बनवला? पाहा त्यावेळी किती होती किंमत
नाशिकच्या मातीचाही प्रकार वेगळा
नाशिकची माती वेगळ्या प्रकारची आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. लालसर रंगाची ही माती असून एका अहवालानुसार, एकट्या नाशिक शहरात दरवर्षी २० टनांहून अधिक द्राक्षांचे उत्पादन होते.