The City Of Joy: भारतातील प्रत्येक शहराला काही ना काही इतिहास आहे. प्रत्येक शहराचं त्याचं असं वेगळं एक सौंदर्य आहे. भारतातील प्रत्येक शहर आपल्यातच एक खास आहे. भारतात वेगवेगळ्या बोलीभाषा, रुढी-परंपरा, संस्कृती, सण आहेत; यामुळेच एका देशात असूनही प्रत्येक शहरातील भिन्न भिन्न गोष्टींचं महत्त्व अनेकदा अधोरेखित केलं जातं. जसं मुंबईला स्वप्नांचं शहर असं म्हटलं जातं, तसंच बंगालमधील कोलकाता या शहरालाही एक खास नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोलकाता हे शहर भारतातील पश्चिम बंगाल राज्याची राजधानी आहे. हुगळी नदीच्या (गंगेची एक उपनदी) किनाऱ्यावरील हे शहर १७७२ पासून १९१२ पर्यंत ब्रिटीश भारताचीही राजधानी होती. कोलकाता हे देशातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का की कोलकात्याची एक खास आणि आगळी वेगळी ओळखदेखील आहे. आधीच्या काळापासून चालत आलेली संस्कृती, भव्य उत्सव आणि इथल्या मैत्रीपूर्ण लोकांसाठी कोलकात्याला आनंदी शहर (द सिटी ऑफ जॉय- The City Of Joy) असे म्हटले जाते.

हेही वाचा… ‘या’ भारतीय रेल्वे स्थानकांवरून थेट जाऊ शकता परदेशात; जाणून घ्या सविस्तर माहिती

‘सिटी ऑफ जॉय’

कोलकात्याचं ‘सिटी ऑफ जॉय’ हे नाव डॉमिनिक लॅपियरच्या पुस्तकातून आले आहे. या पुस्तकात कोलकात्यातील लोकांची भावना दिसून येते.

कल्चर हब

कोलकाता शहर हे कला, संगीत, पुस्तके आणि चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. या शहरातून अनेक सर्जनशील लोक येतात.

हेही वाचा… आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या चेकचे नेमके प्रकार किती? जाणून घ्या

दुर्गा पूजा

जसा मुंबई-पुण्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, तसं कोलकाता येथे दुर्गापूजा हा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी संपूर्ण शहर आनंदाने आणि उत्साहाने हा सण साजरा करतात.

प्रसिद्ध इमारती

कोलकात्यात ब्रिटीशकालीन अनेक जुन्या इमारती आहेत. येथील व्हिक्टोरिया मेमोरियल आणि हावडा ब्रिज प्रसिद्ध आहेत.

हेही वाचा… Minimum Balance बँक खात्यात न ठेवल्यास कोणती बँक किती शुल्क आकारते? जाणून घ्या

शिक्षण आणि कल्पना

कोलकात्यामध्ये अनेक महान विचारवंत आणि कलाकार याआधी होऊन गेले आहेत आणि आताही आहेत. हे नोबेल विजेत्यांचे घर आहे असं म्हटलं जातं. येथे शिक्षणाला खूप महत्त्व दिले गेले आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which city in india is known for city of joy know details dvr