आपण रंगीबेरंगी फुले पाहतो. उद्यानात, घरातील अंगणात, अगदी शहरी भागातील बाल्कनी गार्डनमध्ये ही फुलं उठून दिसतात. आवड म्हणून अनेकजण विविध रंगांची, रुपाची आणि सुगंधाची फुले आपल्या दारात लावतात. गुलाबाची, मोगऱ्याची, सायलीची, जाई-जुई अशा असंख्य फुलांनी आपल्या घराचा एक कोपरा सजवून ठेवला जातो. पण तुम्हाला माहितेय का सर्वांत जास्त पाकळ्या असलेलं फुल कोणतं आहे?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकळ्या हा फुलांचा रंगीबेरंगी आणि आकर्षक भाग असतो जो कीटकांना आकर्षित करत असतो. परागकणासाठी कीटकांना आकर्षित करणे आणि फुलांच्या मध्यभागी असलेल्या पुनरुत्पादक अवयवांचे संरक्षण करणे हे पाकळ्यांचं मुख्य आणि प्रामुख्याने कार्य असतं. पाकळ्यांना फुलांचा निर्जंतुक भाग असंही म्हणतात.

हेही वाचा >> पक्ष्यांना गुडघे असतात का? त्यांच्या पायांची रचना विचित्र का असते?

एकाबाजूला एक असलेल्या पाकळ्या एकमेकांना चिकटून सुरेख फुल तयार करत असतात. त्यामुळे ज्या फुलाला सर्वाधिक पाकळ्या असतात ते फुल नेत्रदिपक दिसतं. मीडो बटरकप या फुलाला सर्वाधिक पाकळ्या असतात, अशी माहिती बीबीसीच्या डिस्कव्हर वाईल्डलाईफ या वृत्तस्थळाने दिली आहे. याच फुलाला मार्श झेंडू असंही म्हणतात.

हेच ते मिडो बटरकप फूल, आहे की नाही सुंदर?

मीडो बटरकपला बॅचलर बटण म्हणूनही ओळखलं जातं. पिवळ्या धम्मक रंगाचं हे फूल सूर्यफुलाप्रमाणे दिसतं. अशी फुल सहसा उद्यानात आढळतात. तसंच, युरोप किंवा उत्तर अमेरिकेत ही फुलं आढळतात. बटरकपला त्यांचा चमकदार रंग पृष्ठभागाच्या थरातील पिवळ्या रंगद्रव्यांपासून प्राप्त होतो. या फुलांसाठी इतर झाडांप्रमाणे सूर्यकिरणांची गरज असते. सूर्यकिरणही या फुलाच्या पिवळ्या धमक रंगाला कारणीभूत आहे. त्यामुळेच या फुलासाठी मे महिना चांगला काळ मानला जातो. उत्परिवर्तनामुळे फुलांमुळे अधिक पाकळ्या निर्माण होतात, अशी माहिती वनस्पतिशास्त्रज्ञ फिल गेट्स यांनी दिली.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which flower has more petals know more about miracle of nature sgk