टॅटू काढणे ही सध्याच्या काळातील फॅशनचा भाग आहे. गेल्या काही वर्षांमध्ये लोक टॅट काढण्याचे प्रमाण वाढले आहे. खासकडून तरुणांचा टॅटू गोंदवण्याकडे अधिक कल असल्याचे पाहायला मिळते. आधीच्या काळात ठराविक समूहाचा भाग असलेल्या लोकांना एका प्रकारे ओळखपत्र म्हणून शरीरावर विशिष्ट ठिकाणी टॅटू काढून घ्यावा लागत असे. पुढे कालांतराने त्याचे प्रमाण कमी-कमी होत गेले. नव्वदच्या काळात भारतामध्ये पाश्चिमात्य देशांमधून टॅटू संस्कृती पुन्हा उदयास आली.

आजही देशामध्ये काही ठिकाणी टॅटू काढणे वाईट आहे असा समज आहे. जर एखादी व्यक्ती टॅटू गोंदवणार असेल किंवा गोंदवण्याचा विचार करत असल्यास लगेच सरकारी नोकरीचा विषय आपोआप निघतो. शरीरावर कोणत्याही प्रकारचा टॅटू असलेल्या व्यक्तीला सरकारी नोकरी मिळत नसल्याचे लहानपणापासून आपल्याला सांगितले जाते. फक्त सरकारी क्षेत्रामध्येच नाही तर काही खासगी कंपन्यांमध्येही टॅटू पूर्णपणे बॅन आहे. कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असलेल्या व्यक्तीच्या शरीरावर छोट्या आकाराचा टॅटू असला, तरी त्याला नोकरीसाठी अर्ज करता येत नाही. शासनाच्या अशा काही विभागाची आम्ही माहिती देणार आहोत, ज्यांमध्ये टॅटूवर पूर्णपणे बंदी आहे.सरकारच्या अनेक विभागांमध्ये बौद्धिक परीक्षेसह शारिरीक चाचणीदेखील घेतली जाते. या चाचणी दरम्यान उमेदवाराच्या शरीरावर काही गोंदवलं आहे की नाही याची खात्री निवड करणारे अधिकारी करत असतात. टॅटूवर बंदी असलेल्या सरकारी विभागांमध्ये

  • भारतीय प्रशासकीय सेवा (IAS – Indian Administrative Service)
  • भारतीय पुलिस सेवा (IPS – Indian Police Service)
  • भारतीय राजस्व सेवा (IRS – Internal Revenue Service)
  • भारतीय विदेश सेवा (IFS – Indian Foreign Service)
  • भारतीय सेना (Indian Army)
  • भारतीय नौसेना (Indian Navy)
  • भारतीय वायुसेना (Indian Air Force)
  • भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard)
  • पुलिस दल (Police Force)

यांचा समावेश होता.

आणखी वाचा – ८ वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय डाक विभागात ‘या’ पदासांठी भरती, लवकर अर्ज करा

शरीरावर टॅटू असलेल्या व्यक्तीला सरकारी नोकरी करता न येण्यामागील कारणे

  • टॅटू गोंदवताना शाई त्वचेच्या आत रक्तामध्ये मिसळत असते. यामुळे एचआयवी, हिपॅटायटीस A आणि B आणि अन्य त्वचा रोग होण्याची शक्यता असते. यामुळे व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते.
  • शरीरावर टॅटू असलेली व्यक्ती शौक पूर्ण करण्यावर भर देत असते असे म्हटले जाते. अशा व्यक्तीला कामावर ठेवल्यावर तो/ती कामापेक्षा स्वत:चे शौक पूर्ण करण्याकडे लक्ष देत राहील असे अधिकाऱ्यांना वाटते.
  • तिसरे आणि सर्वात महत्त्वपूर्ण कारण म्हणजे सुरक्षा. या कारणामुळे बहुसंख्य लोकांना सरकारी नोकरीवर ठेवले जात नाही. शत्रूद्वारे पकडले गेल्यावर टॅटूमुळे व्यक्तीची ओळख समजू शकते. असे घडू नये म्हणून सरकारी अधिकारी कधीही शरीरावर काहीही गोंदवून घेत नाही.