Which is most Old Color in the World : जगात असंख्य रंग आहेत. विविध रंगांनी पृथ्वी सजलेली आहे. झाडा-झुडपांची हिरवाई, आकाश-सागराची निळाई, विविधरंगी फुलांमुळे जग सुरेख आणि सुंदर दिसतं. जगातील हे असंख्य रंग विविध नैसर्गिक रंगांनी तयारी झालेले आहेत. पण जगातील सर्वांत जुना रंग कोणता? असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल का? कारण, पृथ्वीची निर्मिती झाल्यापासून असंख्य रंगांचा इतिहास असताना सर्वांत जुना रंग कसा काय शोधता येऊ शकेल? काही वर्षापूर्वी झालेल्या एका अभ्यासातून जगातील सर्वांत जुना रंग कोणता याची माहिती मिळालेली आहे. सीएनएनने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
चमकदार गुलाबी म्हणजेच BRIGHT PINK हा रंग जगातील सर्वांत जुना रंग आहे. २०१८ साली झालेल्या एका संशोधनानुसार ही माहिती समोर आली. संशोधकांना पश्चिम आफ्रिकेच्या मॉरिटानिया येथे ताउदेनी बेसिनमधील सहारा वाळवंटाच्या खाली खोलवर असलेल्या १.१ अब्ज वर्ष जुन्या खडकांमध्ये प्राचीन गुलाबी रंगद्रव्ये सापडली. त्यामुळे हा रंग सर्वांत जुना रंग असल्याचं म्हटलं जातंय.
हेही वाचा >> मुंबई, दिल्लीत श्वास कोंडला! हवेचा गुणवत्ता निर्देशांक म्हणजे काय? तो कसा मोजतात? जाणून घ्या…
ऑस्ट्रेलिया नॅशनल युनिव्हर्सिटीचे पीएचडी अभ्यासाक डॉ. नूर गुएनेली यांच्या म्हणण्यानुसार, गुलाबी रंग सर्वात जुन्या ज्ञात रंगद्रव्यांपेक्षा ५०० दशलक्ष वर्षांहून अधिक जुना आहे. हा रंग प्राचीन सागरी जीवांनी तयार केला आहे, असंही त्यांचं म्हणणं आहे. डॉ. नूर गुएनेली हे रंगद्रव्यांचा अभ्यास करतात.
हेही वाचा >> Lightning Detection Device काय आहे? वीज कोसळल्यानंतर जीवितहानी रोखणारं उपकरण कसं काम करतं?
रंगद्रव्ये शोधण्यासाठी संशोधकांनी अब्जावधी वर्ष जुन्या खडकांची माती बनवली. यातून प्राचीन जीवांचे रेणू काढले आणि त्यांचे विश्लेषण केले. खडके फोडल्यानंतर त्यातून चमकदार गुलाबी रंग दिसू लागला. परंतु, खडकं जेव्हा एकसंध असतात तेव्हा ते जांभळ्या रंगाचे असतात, असंही संशोधकांनी स्पष्ट केलं.