India’s Longest Bus Journey : भारतात वाहतुकीची अनेक साधनं आहेत. रेल्वेनंतर सर्वाधिक जाळं असलेलं वाहतुकीचं साधन म्हणजे बस. बस देशातील विविध राज्यातील विविध गावांतील कानाकोपऱ्यात जाते. त्यामुळे ग्रामीण भाग आणि शहरी भागात बसला वाहतुकीचा कणाही म्हटलं जातं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतातील सरकारी आणि खासगी बस सेवा देशाच्या वाहतूक व्यवस्थेचा कणा म्हणून ओळखल्या जातात. तसंच, भारताचा वैविध्यपूर्ण भूगोल, संस्कृती आणि समाज जवळून जाणून घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी बस प्रवास हा चांगला पर्याय असल्याचं म्हटलं जातं. तुम्हीही गावातून शहरात येण्याकरता किंवा शहरातून गावी जाण्याकरता किंवा शहरांतर्गत फिरण्याकरता अनेकदा बसचा वापर केला असेल. पण भारतातील सर्वांत लांब बस प्रवास कोणता हे तुम्हाला माहितेय का? तेच या लेखातून जाणून घेऊयात.

भारतातील सर्वांत लांब बस प्रवास जोधपूर ते बंगळुरू आहे. ज्यांना लांबचा प्रवास करायला आवडतो ते लोक या बसमार्गाचा वापर करतात. हा प्रवास तुम्हाला भारतीय संस्कृती आणि त्यातील विविधतेबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत करतात.

हेही वाचा >> Diamond Crossing : महाराष्ट्रातील ‘या’ शहरात आहे डायमंड क्रॉसिंग; चारही बाजूने धावतात ट्रेन, तरीही होत नाही अपघात

किती लांब आहे हा बस प्रवास? (The Longest Bus Journey in India)

बसचा प्रवास खूप लांब असल्याने शारिरीक आणि मानसिक तयारी करावी लागते. हे भारतातील कोणत्याही सरकारी बस प्रवासापेक्षा २ हजार किलोमीटरहून अधिक अंतर व्यापते.

३६ तासांत चार राज्ये

या बस प्रवासात राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या एकूण चार राज्यांचा समावेश होतो. प्रवास करताना तुम्ही अनेक गावे, शहरे आणि महानगरांमधून जाता. तसंच, या गावातील नैसर्गिक दृश्यही तुम्हाला अनुभवता येतात.

समुद्रकिनाऱ्याहून बस प्रवास

प्रवासादरम्यान बस काही काळ समुद्रकिनारी धावते. ही बस महाराष्ट्रातील नाशिक, पुणे या शहरांमधून धावते.

दिल्लीहून लेह हा सर्वांत लांब प्रवास?

काही पुस्तकांमध्ये दिल्ली ते लेह हा भारतातील सर्वांत लाब बस प्रवास असल्याचं म्हटलं आहे. या प्रवासात १०७६ अंतर व्यापले जाते. यासाठी हिमाचल प्रदेश सरकारची बस बूक करावी लागते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which is the indias longest bus journey which travel 36 hrs and covered 4 states sgk