National Tree of India: समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या देशांमध्ये आपल्या भारताचेही नाव घेतले जाते. एवढेच नव्हे, तर भारताची संस्कृती ही जगातील सर्वांत प्राचीन संस्कृती आहे. भारत हा जगातील सातव्या क्रमांकाचा सर्वांत मोठा देश असून, पर्वतीय भूभाग आणि समुद्राचे सान्निध्य यांमुळे भारत आशियाच्या इतर भागांपासून वेगळा आहे. दक्षिणेकडे पसरलेल्या भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आणि पश्चिमेला अरबी समुद्र, हिंद महासागर व उत्तरेच्या सीमेवर हिमालय आहे. याच भारत देशाचे राष्ट्रीय पक्षी, प्राणी तुम्हाला ठाऊक असतीलच; पण भारताचे राष्ट्रीय वृक्ष कोणता हे तुम्हाला ठाऊक आहे का? आज आपण या विषयासंदर्भात माहिती जाणून घेऊ…
वटवृक्ष आहे भारताचे राष्ट्रीय वृक्ष
वटवृक्ष हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. भारतीय पौराणिक कथांमध्ये वटवृक्षाचे अमर वृक्ष म्हणून वर्णन केल्याचे आढळते. हे झाड विस्तृत क्षेत्रामध्ये पसरते, मूळ धरते आणि हजारो वर्षे जगते. तसेच हे कालांतराने हा वृक्ष खोड व फांद्या यांद्वारे अधिक विस्तार करतो आणि स्वत:चे आयुर्मान वाढवतो. या झाडावर अनेक पक्षी घरटी बांधून राहतात आणि अनेक जण क्षणभराच्या विश्रांतीसाठी या झाडाच्या सावलीत विसावतात.
वटवृक्षाला राष्ट्रीय वृक्ष का म्हटले जाते?
हिंदू धर्मात वटवृक्षाला पूजनीय मानले जाते. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी वटवृक्षाला म्हणजेच वडाला धागा गुंडाळून, विवाहित महिला आपल्या पतीसाठी दीर्घायुष्याची मागणी करतात. त्यामुळे वटवृक्ष ‘अश्वथ वृक्ष’ म्हणूनही ओळखला जातो. त्याच्या सतत विस्तारणाऱ्या शाखांमुळे तो अनंतकाळचे जीवन दर्शवतो. तसेच वटवृक्षाला कल्पवृक्ष, असेही म्हणतात, ज्याचा शाब्दिक अर्थ ‘इच्छा पूर्ण करणारा पवित्र वृक्ष’ असा होतो. वटवृक्षाचे पौराणिक अमरत्व आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेता, वटवृक्षाची निवड राष्ट्रीय वृक्ष म्हणून करण्यासाठी हा एक सोपा पर्याय होता. त्याशिवाय अनेक लोककथा आणि पौराणिक परंपरा या वृक्षाशी संबंधित आहेत, ज्याला भारतीयांनी फार पूर्वीपासून आदर दिला आहे. आलाराम हे वटवृक्षाचे दुसरे नाव आहे.
हेही वाचा: हृदयाशिवाय जगणाऱ्या ‘या’ जलचरांची नावं तुम्हाला ठाऊक आहेत का? जाणून घ्या…
जगातील सर्वांत मोठा वृटवृक्ष
जगातील सर्वांत मोठे झाड आता भारतातील कोलकाता येथे आहे. १८७३ मध्ये हवाईच्या लहेना कोर्टहाऊस स्क्वेअरवर एक वटवृक्ष लावला गेला. आता या वृक्षाने एक एकरचा दोन-तृतियांश भाग व्यापला आहे.