National Vegetable of India: तुम्हाला माहीत आहे का भारताची राष्ट्रीय भाजी कोणती आहे? मोठ्या प्रमाणात पिकवलेली आणि पोषक घटकांनी परिपूर्ण असलेली ही भाजी अनेक भारतीय पदार्थांमध्ये वापरली जाते. ही भाजी म्हणजे भोपळा.

सहज वाढीमुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन

भारताच्या अनेक भागांत भोपळा पिकवला जातो. भोपळ्याचा विविध पदार्थांमध्ये त्याचा वापर केला जातो. शेतकरी घरातील बाग आणि शेतात त्याची लागवड करतात. कारण- त्याची सहज वाढ होते.

पोषक घटकांनी समृद्ध

भोपळ्यामध्ये अ, क व ई ही जीवनसत्त्वे असतात. ज्यामुले शरीर निरोगी राहते. या जीवनसत्त्वांमुळे दृष्टी सुधारते. तसेच त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्वचाही चमकदार होते.

सहज उपलब्धता

वर्षभर बाजारात तुम्हाला भोपळे मिळतात. ही सर्वांत परवडणारी भाज्यांपैकी एक आहे आणि प्रत्येक हंगामात विकली जाते.

पचनास समर्थन

भोपळ्यात फायबर असते, जे पचन सुलभ करण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठता टाळते. भोपळा नियमितपणे खाल्ल्याने पोट निरोगी राहते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.

कमी कॅलरीज

वजन कमी करण्यासाठी भोपळा उपयुक्त आहे. कारण- त्यात कमी कॅलरीज असतात. अनेकांच्या डाएट प्लॅन्समध्ये भोपळा समाविष्ट असतो. कारण- तो वजन न वाढवता, तुमचे पोट भरलेले ठेवतो.

उत्सवांमध्ये वापर

भारतात लोक धार्मिक विधी आणि उत्सवांमध्ये भोपळ्यांचा वापर करतात. काही कुटुंबे नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी त्यांच्या घराबाहेर भोपळा फोडतात.

दरम्यान, भोपळा ही भाजी चवीला गोडसर आणि पटकन शिजणारी असते; परंतु काहींना ती आवडत नाही. त्यामुळे अनेक जण भोपळ्याची भाजी पाहिल्यावर नाके मुरडतात. परंतु, ही भाजी शरीरासाठी गुणकारी असून, त्याचे अनेक फायदे आहेत. अनेक ठिकाणी भोपळ्याला डांगर किंवा तांबडा भोपळा, असंही म्हणतात.