Smallest Airport In India : भारतात कोट्यवधी लोक प्रवास करण्यात वेगवेगळ्या ट्रान्सपोर्टेशनचा वापर करतात. टॅक्सी, ट्रेन्स, बस आणि विमानाच्या माध्यमातून भारतीय नागरिक प्रवास करतात. विमानप्रवास हा ट्रान्सपोर्टचा सर्वात वेगवान घटक आहे. विदेशात जाण्यासाठी किंवा दूरचा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना विमानाने जाणं सोयीचं ठरतं. वेळेची बचत करण्यासाठी अनेक लोक विमानातून प्रवास करण्याला पसंती दर्शवतात. एअर ट्रॅव्हलला विशिष्ट विमानतळावर जाण्यासाठी प्रवाशांची आवश्यकता असते. प्रवासी चेक इन करून त्यांच्या प्रवासाला सुरुवात करतात. विमानाने प्रवास करणे प्रवाशांना आरामदायक वाटतं. भारतात असंख्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. परंतु, भारताच्या एका ठिकाणी सर्वात लहान विमानतळ बांधण्यात आलं आहे.

या ठिकाणी आहे सर्वात लहान विमानतळ

भारतातील बाल्झाक विमानतळ उर्फ तुरा विमानतळ हे देशातील सर्वात लहान विमानतळ आहे. मेघालया राज्यात उत्तर-पूर्व प्रदेशात जवळपास ३३ किलोमीटर अंतरापर्यंत याचा विस्तार आहे. विशेषत: २० सीटर डॉर्नियर २२८ या विमानांसाठी हे विमानतळ बांधण्यात आलं आहे. या विमातळाचा विस्तार वाढवण्याची मागणी केली जात आहे. परंतु, अतिरिक्त जाग उपलब्ध करुन देण्याची मुदत २०२२ पर्यंत असल्याचं बोललं जात आहे. या विमानतळावर लहान रनवे आहे. या रनवेचा विस्तार फक्त १ किमीपर्यंत आहे. छोट्या विमानांसाठी या रनवेचा वापर होतो.

Mumbai airport international travelers
Mumbai Airport International Passengers: मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nagpur Kolkata bomb threat
आकाशात झेपावलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन अन्…
traffic congestion, Parking problem APMC navi mumbai double parking, trucks
एपीएमसीतील पार्किंग समस्या जटिल, ट्रकच्या दुहेरी पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
expansion of air india service after merger of vistara
विस्तारा’च्या विलीनीकरणातून एअर इंडियाच्या सेवेत विस्तार; विमानांचा ताफा ३०० वर, तर साप्ताहिक उड्डाणे ८,५०० वर
airship replace aircarft
‘एअरशिप्स’ घेणार विमानांची जागा? याचा अर्थ काय? भविष्यात एअरशिप्सचा कसा फायदा होणार?
Vistara Completes Merger With Air India
‘विस्तारा’ नाममुद्रा इतिहासजमा; एअर इंडियामध्ये विलीनीकरण पूर्ण

नक्की वाचा – Oppenheimer: काय आहे IMAX? आयमॅक्स आणि सामान्य चित्रपटगृहात काय फरक असतो? जाणून घ्या

विमानतळाच्या प्रकल्पाचा प्रस्ताव १९८३ मध्ये देण्यात आला होता आणि १९९५ मध्ये या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. त्यानंतर २००८ मध्ये या विमानतळाचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं. यासाठी १२.५२ कोटी रुपयांचा निधी वापरण्यात आला. संपूर्ण भारतात १५३ विमानतळ आहेत. यापैकी ११८ राष्ट्रीय विमानतळ आहेत. तर ३५ आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. ही विमानतळे असंख्य प्रवाशांची जीवनवाहिनी आहेत. या विमानतळांवरून देशांतर्गत आणि विदेशात प्रवास करणं अधिक सोपं जातं.