TDS ही उत्पन्नाच्या स्रोतांमधून कर गोळा करण्याची सरकारी प्रक्रिया आहे. एखादी कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही टक्के कर कपात करते, जी सरकारकडे जमा केली जाते. कर भार कमी करण्याच्या उद्देशाने पगार, व्याज, भाडे आणि कमिशन यांसारख्या विविध उत्पन्न श्रेणींना लागू होते. भारतातील TDS प्रणाली ही कर्मचारी आणि कंपनी दोघांसाठीही महत्त्वाची असते. परंतु नवीन कर प्रणाली विरुद्ध जुनी कर प्रणाली यातील पगारावरील टीडीएस कपात करून घेण्यासाठी कोणती फायदेशीर आहे हे जाणून घेणार आहोत. नवीन आर्थिक वर्ष २०२४-२५ हे १ एप्रिलपासून सुरू झाले आहे. परंतु मागील वर्षाचे प्राप्तिकर कायदे हे आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी लागू राहतील. कारण सरकारने त्यात कोणताही बदल केलेला नाही. निवडणुकीनंतर आगामी अर्थसंकल्पात संभाव्य बदलांची घोषणा केली जाऊ शकते. या आर्थिक वर्षातील कर नियोजनाच्या दृष्टीने पगारदार व्यक्तींसाठी एप्रिल महिना महत्त्वाचा आहे. कारण त्यांना त्यांच्या नियोक्त्यांना आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी जुनी किंवा नवीन कर व्यवस्था निवडण्याची संधी मिळते. ही निवड त्यांच्या वर्षभरातील पगाराच्या उत्पन्नातून वजा केलेल्या कराची रक्कम ठरवते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा